– ठिकठिकाणांहून ‘अमृत कलश’ होणार रवाना नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सर्वच 764 ग्रामपंचायतींनी उत्सफुर्त व सक्रीय सहभाग घेतला. या गावांमधून माती व तांदळाने भरलेले ‘अमृत कलश’ पुढील प्रवासासाठी तालुकास्तरावर पाठविण्यात येणार आहेत.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही 1 ते […]

– 29 सप्टेंबर ‘शौर्य दिन’ साजरा नागपूर :- अतिरेक्यांच्या हल्ल्यांना आपण फक्त प्रतिकार करण्याचे काम करीत असतो. पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय 18 सैनिक मारले गेले. ही दुदैवी घटना घडली होती. त्यांच्या दुष्कृत्याला धाडसाने दिलेल उत्तर म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक’ होय, असे मेजर जनरल अच्चुत देव यांनी स्पष्ट केले. शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत […]

– नागपुरातील पूरपरिस्थितीचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून आढावा  – कॅबिनेटमध्ये आराखडा सादर करणार – २ ऑक्टोबरपर्यंत आराखडा अंतिम करा – सरसकट मदतीसाठी शासनाचा प्रयत्न – ३ ऑक्टोबरपासून सानुग्रह निधीचे वाटप नागपूर :- महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरला भविष्यात कधीही पूर परिस्थितीचा फटका बसू नये. यासाठी कायमस्वरूपी संरक्षण व पूर नियंत्रणासाठी विशेष पॅकेज देण्यात येईल, असे सूतोवाच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री […]

नागपूर :- नागपूर शहरात शुक्रवारी २२ सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे बाधित पुरग्रस्त भागाची महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सकाळी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अंबाझरी तलावाचा क्षतिग्रस्त भाग, कॉर्पोरेशन कॉलनी, काछीपुरा झोपडपट्टी, […]

– कोरोडी येथे २७० मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूर :- संपूर्ण नागपूर शहरामध्ये भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दहाही झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व विसर्जन कुंडांवर एकूण १४४१६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. याशिवाय ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आलेली असून येथे […]

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २ ऑक्टोबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत. उपायुक्तांच्या आदेशानुसार, महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन जीइएन – १०८७/१२८६/सीआर-९३/८७/नवि/१०, दिनांक २२ एप्रिल १९८७ नुसार सोमवार […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून नागपूर जिल्ह्या हे तत्कालीन पालकमंत्री व नागपूर विधानपरिषदचे विद्यमान सदस्य चंद्रशेखर बवाबकुळे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून कामठी तालुक्यातील गादा गावाजवळच्या प्रशस्त जागेवर जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी 29 मार्च 2016 ला 26 करोड रूपयाच्या मंजूर […]

मुंबई :- राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले […]

– १ ऑक्टोबर रोजी परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर रोजी नजिकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर रोजी राज्यातील गड -किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड समोर हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या आरोपीस अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना गतरात्री यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव शेख अफराज अब्दुल जब्बार रा अब्दुल्लाह शाह दरगाह जवळ कामठी असे आहे.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात विराजमान कामठी चा राजा चे थाटात मिरवणूक काढून महादेव घाट कॅन्ट कामठी येथे विसर्जन करण्यात आले. श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी येथील शैक्षणिक परीसरात मागील १० दिवस कामठी चा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनी […]

खापा :- दिनांक ०२/०३/२०२३ चे दुपारी ०२.३० वा. ते दिनांक २६/०९/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी व आरोपी नामे १) धीरन हिवरकर वय २१ वर्षे २) लकी धार्मीक वय २० वर्ष, ३) विकास हेडाउ, वय २३ वर्ष, ४) वेदु आवते, वय २३ वर्ष, ५) गोलु लिखार, वय २५ वर्ष, ६) लिलाधर चौरागडे, ७) सुशिल धार्मिक, ८) गौरव खुबाळकर, […]

कन्हान :- अंतर्गत ०१ कि. मी. अंतरावरील फिर्यादीचे रहाते घराजवळून जवाहर नगर कन्हान येथे दिनांक १४/०७/२०२३ चे १५.०० वा. ते १६.०० वा. दरम्यान फिर्यादी रोहीत सिद्धार्थ मानवटकर, वय ३० वर्ष रा. प्रभाग क्र. ४ जवाहर नगर कन्हान जि. नागपूर हा घर बांधकामाचे मजुरीचे काम करतो. कामाने लांब जावे लागत असल्याने फिर्यादी यांनी सन २०१६ मध्ये अॅक्टीवा 3G दुचाकी मोपेड गाडी […]

नागपूर :-दोषसिध्द आरोपी चेतन विश्वनाथ मुंडले, वय ३० वर्ष रा. चापेगडी ता. कुडी याच्या विरुध्द पोस्टे कुही येथील अपराध क्र. २५/२०१६ कलम ३५४, ३४२ ५०६ भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुलगीर यांनी केला व गुन्हयाचे दोषारोपपत्र मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी कुही याच्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ होते. सदर गुन्हयातील पिडीत साक्षदार व पंचांचे बयान तसेच आरोपी विरूद्ध उपलब्ध […]

नागपूर :-श्रीराम महादेव केळवदे यांनी पोलीस स्टेशन रामटेक येथे तक्रार दाखल केली की, त्यांची काळया रंगाची बजाज डिस्कव्हर कंपनीची क्र. MH 40 / AD 5432 गाडी ही राखी तलाव रामटेक येथे उभी करून ठेवली असता चोरीस गेलेली आहे. अशा त्यांच्या तक्रारी वरून पोस्टे रामटेक येथे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण […]

नागपूर :- नुकत्याच संपन्न झालेल्या मनपा स्तरीय स्पर्धामध्ये प्रहार मिलिटरी स्कूल च्या विद्यार्थांनी गाजवला पराक्रम. कुस्ती मध्ये 3 मुले व एक मुलगी यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये सलग दुसरे स्थान मिळवले. रायाफल शूटिंग मध्ये 4 सुवर्ण, 7 रौप्य तर 8 कास्य पदक मिळवले.कॅरम मध्ये 1 सुवर्ण.तलवारबाजी मध्ये 1 सुवर्ण मिळवत प्रहार च्या विद्यार्थ्यांनी पराक्रम गजवीला. शाळेच्या प्राचार्या वंदना कुळकर्णी यांच्या हस्ते खेळाडूंचे […]

नागपूर :- महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत 1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त दिनांक 5 ऑक्टोबर 2023 ला नागपूर शहरातील जेष्ठ नागरीकाकरीता कार्यरत संस्थांचे सत्कार करण्याचे नियोजीत आहे. करीता नागपूर शहरातील जेष्ठ नागरीकांकरीता कार्यरत संस्थानी वर्षभरात जेष्ठ नागरीकांकरीता केलेल्या कार्याचा अहवाल दि. 03/10/2023 ला सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत समाज विकास विभाग प्रशासकीय इमारत 4 था माळा, ‘A’ विंग, महानगरपालिका, नागपूर येथे सादर […]

– प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत आयोजन नागपूर :- नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये कार्यरत स्वयंपाकी मदतनीस, पालक व शिक्षक यांच्याकरिता आयोजित पाककृती स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत सोमवार (ता. २५) रोजी सिव्हील लाईन्स स्थित सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत ‘सप्टेंबर महिना पोषण आहार […]

बेला :- पंचक्रोशीतील प्रख्यात संत बालयोगी परमहंस रामचंद्र महाराज यांचा अकरावा पुण्यस्मरण व समाधी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. तीर्थक्षेत्र कडाजना येथून आलेल्या विलोभनीय भव्य पालखी, टाळ मृदंगाच्या निनादात भजनी दिंड्यांनी संतभूमी बेला नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. अखंड हरिनामाच्या धार्मिक सप्ताहाला सुद्धा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालयोगी रामचंद्रबाबा यांची बेला ही जन्मभूमी आहे. परंतु त्यांनी बेला लगतच्या वेना नदी काठावरील […]

– विद्यापीठात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार कायद्यावर व्याख्यान संपन्न अमरावती :- माहिती अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमबलजावणी व्हावी, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात गुरुवार दि. 28 सप्टेंबर, 2023 रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांची उपस्थिती होती. कुलसचिव पुढे […]

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com