संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी तालुक्यात रोवणीला आला वेग  कामठी :- मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हवालदिल झालेल्या कामठी तालुक्यातील शेतकरी बांधवांना मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाच्या जोरदार सरींनी दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला कामठी तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून रोवणीची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी धावपळीत लागला. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने धोका दिल्याने शेतकरी बांधव […]

मुंबई :-अर्थसंकल्पात ग्रामीण भारताच्या विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच युवांसाठी 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा निर्णयही अर्थसंकल्पातून मांडण्यात आला. याव्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प तळागाळातील लोकांना आणि शेवटच्या घटकांना दिलासा देणारा असून सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा अर्थसंकल्प […]

नागपूर :- शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी वृक्षारोपणावर भर द्यावा, अशा सूचना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. मंगळवारी (ता:२३) शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मनपाद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. त्यांनी विविध विभागांना वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याचे ही निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, […]

नवी मुंबई :- “स्वराज्य हा माझा जन्मसिदध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ” अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून ख्यातनाम भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकीय तत्वज्ञ, संपादक आणि लेखक तसेच ‘लाल बाल पाल’ या त्रैमूर्तीमधील एक. भारतीय असंतोषाचे जनक. ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी […]

नागपूर :-  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी व या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवावी, शासन-प्रशासनाद्वारे प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मंगळवारी (ता:२३) […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- विविध प्रलंबीत मागण्यासाठी कामठी तहसील कार्यालयाच्या महसूल कर्मचाऱ्यांनी मागील दहा दिवसापासून पुकारलेला संप अजूनही कायमच आहे. तेव्हा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावरील प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी,महसूल विभागाचा आकृतिबंध तात्काळ लागू करावा, नायब तहसीलदार संवर्ग 4 हजार 800 रुपये करावा,महसूल सहाय्यक या संवर्गाचा ग्रेड पे 1900 रुपया वरून 2400 रुपये करणे ,अव्वल कारकुन संवर्गाचे पदनाम बदलवून […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागिल 20 जुलै पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कामठी तालुक्याला चांगलाच फटका बसला ज्यामुळे नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले असून कामठी तालुक्यातील कामठी नगर परिषद क्षेत्र,कामठी,कोराडी, महालगाव,तरोडी,वडोदा या मंडळातील 27 गावे बाधित झाले असून तीन हजार च्या जवळपास नागरिकांच्या घरात पाणी शिरले तसेच कामठी मंडळातील चार व तरोडी गावातील 1 असे पाच घरे पूर्णता पडल्याने […]

मुंबई :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरातील नागरी सुविधा निर्मितीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) विकसित करण्यासह त्या जमिनीवर वाढीव नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करावा. त्या जमिनीचा मोबदला पशुसंवर्धन विभागास देऊन महानगरपालिकेने जमीन ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री […]

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात ज्या प्रमुख चार घटकांना […]

मुंबई :- मे. रेमंड लक्झरी लि., कागल, जि. कोल्हापूर या कंपनीमधून कमी केलेल्या कामगारांना कंपनीने पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय आठ दिवसांत घ्यावा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. यासंदर्भात कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी […]

नागपूर :- “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्यलढयाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी अति. आयुक्त आंचल गोयल, जनसंपर्क अधिकरी मनिष सोनी, […]

मुंबई :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार आशुतोष काळे,आमदार अमर काळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे, आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राज्यात सामान्य जनतेच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी पोषक असे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या कृषी, आरोग्य, पर्यटन, पणन, मत्स्य अशाविविध क्षेत्रांचा विकासाच्यादृष्टीने, राज्याचे आर्थिक बळ वाढण्यासाठी विविध योजना तसेच उपक्रम राबविण्यात येत आहेत. सामान्य जनतेच्या हितासाठी घेण्यात आलेले […]

नागपूर :- महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत कार्यरत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मोफ़त आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी महावितरण आणि व्होकार्ट हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा-आरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते  (दि. 23 जुलै) विद्युत भवन येथे करण्यात आले. प्रत्येक कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन यावेली बोलतांना दिलीप दोडके यांनी केले. या शिबिराच्या अनुषंगाने महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी […]

नागपूर :- गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी आपले व आपल्या आईचे गुरु परमपूज्य परिव्राजकाचार्य योगमूर्ती श्री जनार्दनस्वामींच्या पवित्र समाधीचे दर्शन रामनगर स्थित जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळात जाऊन घेतले. गडकरी यांच्या मातोश्री कै. भानु गडकरी पूज्य स्वामीजींच्या शिष्या होत्या आणि त्यांनी महाल विभागात महिलांसाठी निःशुल्क योगवर्ग सुरू केला होता, हे विशेष! ह्या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्रद्धेय […]

नागपूर :- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक संबंधी स्कूलबस धोरणानुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करिता विनियम) नियम २०११ नुसार स्कूलबस सुरक्षा समिती गठित करण्यात आलेली आहे. या बैठकीचा उद्देश असा आहे की, शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित शाळेत ने- आण करणे. नागपूर शहरामध्ये सध्या सर्व शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहे. त्या दृष्टिकोनातून मुलांची सुरक्षा संबंधी,परिवहन शुल्क, बस थांबे निश्चिती,स्कूलबस वाहनांची कागदपत्रे ,नोंदणी […]

नागपूर :- दि.२०/७/२०२४ रोजी नागपूर शहरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. संततधार पाऊस सुरू असल्याने नागपूर शहरात विविध ठिकाणी खोलवर भागात तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचलेले होते. हवामान खात्याने देखील नागपूर शहराकरिता १८ ते २१ जुलै च्या दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली होती व सदर कालावधी करिता ऑरेंज अलर्ट दिलेला होता. दि.२०/७/२४ रोजी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कन्हान शहरात चोरीच्या घटनेत दिवसेदिवस वाढ.  कन्हान :- येथील तारसा रोड वरील इंदिरा नगर चे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम च्या सीसीटीव्ही कँमरे वर काळा पेंट स्प्रे करून दोन्ही बँकेचे एटीएम गँस कटर ने कापुन दोन्ही एटीएम मधिल पाच लाख साठ हजार शंभर रूपयाची चोरी करून अज्ञात चोर पसार झाले. सोमवार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – शिबीरात शंभराहुन अधिक कामगारांनी केले रक्तदान.  कन्हान :- भारतीय कोळसा खदान मजदूर संघ उप क्षेत्र गोंडेगाव कोळसा खुली खदान व्दारे शंभराहुन अधिक कामगारानी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदुर संघाचा स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला. मंगळवार (दि.२३) जुलै ला भारतीय कोळसा खदान मजदुर संघाच्या ७० वा स्थापना दिवस भारती य कोळसा खदान मजदूर संघ […]

नवी दिल्‍ली :- भारताचा चलनफुगवट्याचा दर खालच्या पातळीवर कायम असून स्थिर आहे आणि 4 टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या दिशेने अग्रेसर आहे. 5 योजना आणि उपक्रमांशी संबंधित पंतप्रधानांचे पॅकेज 2 लाख कोटी रुपये खर्चासह 5 वर्षांत 4.1 कोटी युवकांसाठी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि इतर संधी सुलभ करणार ‘विकसित भारत’ साकार करण्यासाठी, अर्थसंकल्पात सर्वांसाठी पुरेशा संधी निर्माण करण्यासाठी नऊ प्राधान्यक्रमांवर सातत्यपूर्ण प्रयत्नांची कल्पना मांडली […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com