मुंबई : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा , तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, २३ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत मुंबई येथे आयोजित […]
Marathi News
गडचिरोली : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा नाझर,आशिष सोरते, चंहादे, सहारे, मेश्राम, उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
मुंबई :- “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार समाधान अवताडे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा […]
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले […]
नागपूर :- नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला विवेक इलमे, कमलकिशोर फुटाणे, तहसीलदार अरविंद सेलोकर , स्वाती इसाई, दीपक काटे, शंकर बळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त विद्या पाटील, विकास दानव, प्रदीप पाटील, अनिल बनकर,प्रमोद नवले, संघमित्रा पुणेकर,संजय चौधरी, महेश नन्हेट, बहादूर जगनाडे, दिलीप नंदवंशी, सुनील नामेवार उपस्थीत होते. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी : स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिवस कार्यक्रम समिती, एन.सी. सी. आणि इतिहास अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (पराक्रम दिवस) महाविद्यालयाच्या ग्रंथालय कक्षात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विशेष दिवस कार्यक्रम समितीचे संयोजक व […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -वासुदेव झाले काळाच्या पडद्याआड,भावी पिढीला वासुदेव इंटरनेटवरच दिसतील कामठी :- डोक्यावर मोरपिसांची निमुळती टोपी ,गळ्यात कवडयाच्या माळा, घोळदार अंगरखा, त्याखाली धोतर,कमरेला शेला त्यात रोवलेले बासरी,हातात पिवळी टाळ, चिपळ्या मुखात अखंड हरिनाम घेत ‘गाव जगवीत आली वासुदेवाची स्वारी’असे म्हणत भल्या सकाळी येऊन धर्म भावना जागरूक करीत गावोगावी होणारी वासुदेवाची स्वारी दिसेनाशी झाली असून हे वासुदेव काळाच्या पडद्याआड […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – नव्याने समित्या केव्हा गठीत होणार? कामठी :- आपल्या कार्यकर्त्याना खुश करून व त्यांच्या माध्यमातून पक्षसंघटन मजबूत व्हावे त्याच बरोबर सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क होऊन त्यांच्याशी जवळकी साधता यावी यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर विविध विभागात विविध समित्या स्थापन केल्या जातात व या समितीत अशासकीय सदस्य पदी आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येते परंतु […]
संदीप बलवीर, प्रतिनिधी – संपूर्ण गावावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे करडी नजर – गुन्हेगारी तसेच अवैध धंद्यावर लागणार लगाम – सरपंच योगेश सातपुते यांचा पुढाकार नागपूर :- सातगाव परिसरात वाढलेली गेन्हेगारी व अवैद्य धंद्यावर आळा घालण्यासाठी परिसरातील येणाऱ्या मुख्य मार्गावरील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण सातगाव मध्ये ग्रामपंचायत सातगावच्या माध्यमातून व सरपंच योगेश सातपुते यांच्या पुढाकाराने एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- नुकत्याच 21 जानेवारीला विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर येथे झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत विदर्भ स्तरीय मास्टर्स मैदानी स्पर्धेत विलास पजई, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी यांनी 5 किलोमीटर पायी चालणे पुरुष वय 45+50 या गटातील स्पर्धेत पहिला क्रमांक सुवर्ण पदकासह पटकावला आहे . या स्पर्धेसाठी विदर्भातील तमाम पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभाग […]
– राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची दिली माहिती मुंबई :- नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात कामठी :-देशाच्या स्वातंत्र लढयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अमूल्य असून मवाळ आणि जहाल या दोन्ही परस्पर विरोधी भूमिका असूनही नेताजींच्या सेनेने आपल्या डाव पेचानी ब्रिटिशाना स्वातंत्र देण्यास भाग पाडले असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती समितिच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. […]
समाजाचे हक्काचे आरक्षण लवकरच मिळणार मा.मुंबई उच्च न्यायालयात १६ फेब्रुवारीला सुनावणी मुंबई :-धनगर समाजाला लवकरच त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल,असा दावा इंडिया अगेन्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे.आज, सोमवारी (ता.२३) धनगर आरक्षणासंदर्भात मा.उच्च न्यायालयात सुनावणी झाली.न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या खंडपीठाने यापूर्वीच धनगर आरक्षणाविरोधात असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाला स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले […]
पारशिवनी :- पारशिवनी पोलिस स्टेशन अर्तगत दक्षिणेस १० कि मि अंतरावर असलेले जे के ब्रिक्स ईटभट्टा डोरली येथे मजुर अंकीत कमलेश जांगडे वय 21 वर्ष रा. दुरुगडी ता. बिलहा जिल्हा बिलासपुर (छत्तीसगड) ह.मु. डोरली तह. पारशिवनी यांनी आज रविवार दिनांक 22/01/23 चे दुपारी ०२.०० वाजता च्या सुमारास पैशाचे तंगीच्या कारणांवरून गळफास घेवुन आत्महत्या केल्याने पोलिस स्टेशन पाराशिवनी येथे मर्ग क्र. […]
द ग्रेट खलींची विशेष उपस्थिती, अंकित तिवारींच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाने नागपूर शहरातील क्रीडा विश्वाला नवी उंची दिली. आपल्या शहरातील क्रीडा विश्वाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील मैदानांच्या विकासाची संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेला राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य असून नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १०० कोटी देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र […]
थोर साहित्यिक, नाटककार, लेखक कै.राम गणेश गडकरी यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला स्मरण करुण विविध संघटना मार्फत भावपुर्वक श्रध्दांजली वाहण्यात आली सावनेर :- थोर नाटककार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथी निमित्ताने गणेश वाचनालय, गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती निलयम, राम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,व्यापारी संघ, आकार रंगभूमी,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ,सामाजिक संस्था तसेच […]
नागपूर :- राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन सेन्साई संजय इंगोले (कराटे NSKA-मुख्य प्रशिक्षक) यांनी आज केले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “नाग स्वराज फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती […]
मुंबई :-अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ते परदेशात असतानाचा सूटाबुटातला फोटो बघितला आणि भारताबाहेर विशेषतः पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या विवाहित दाक्षिणात्य तरुणींची आठवण झाली म्हणजे त्या कशा पाश्चिमात्य फॅशनेबल कपडे घालूनही आपले हिंदुत्व टिकवतात म्हणजे कपाळावर भले मोठे कुंकू आणि गळ्यात लांबलचक मंगळसूत्र घालून वावरतात ते तसे काहीसे शिंदे त्या सुटाबुटात दिसले किंवा पूर्वी कसा नवरदेव त्याच्या लग्नात एकदा आणि शेवटचा […]
मुंबई :- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल, उपसचिव प्राची जांभेकर तसेच राजभवनातील […]