राज्यपाल जातील नवे मंत्री राज्यमंत्री येतील 

मुंबई :-अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ते परदेशात असतानाचा सूटाबुटातला फोटो बघितला आणि भारताबाहेर विशेषतः पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या विवाहित दाक्षिणात्य तरुणींची आठवण झाली म्हणजे त्या कशा पाश्चिमात्य फॅशनेबल कपडे घालूनही आपले हिंदुत्व टिकवतात म्हणजे कपाळावर भले मोठे कुंकू आणि गळ्यात लांबलचक मंगळसूत्र घालून वावरतात ते तसे काहीसे शिंदे त्या सुटाबुटात दिसले किंवा पूर्वी कसा नवरदेव त्याच्या लग्नात एकदा आणि शेवटचा अखेरचा सूट घालून अवघडल्यासरखा वावरायचा तसे हुबेहूब शिंदे काहीसे खूपसे गोंधळल्यासारखे अवघडल्यासारखे दिसत  होते. राजकारणात, प्रेम प्रकरणात, व्यवसायात केव्हा काय होईल सांगता येत नाही विशेषतः राज्याच्या राजकारणात आम्ही सतत संबंधितांशी संपर्कात असतो माहिती घेतो आणि तुम्हाला जशीच्या तशी सांगतो. पुढले पंधरा दिवस राज्याच्या राजकारणात अनेक विविध खूप खूप बहुसंख्य घडामोडींचे आणि हालचालींचे आहे. राज्यातून राज्यपाल कोषारी यांची गच्छंती नक्की आहे पण तत्पूर्वी ते त्या बारा आमदारांच्या नियुक्त्या नक्की करून मोकळे होतील त्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळतील असे दिसते. तसेच मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल देखील या पंधरवड्यात अपेक्षित आहेत. विशेष म्हणजे या दिवसात उभा अख्खा सारा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना वर दिल्लीत घेण्याच्या ज्या बातम्या किंवा हालचाली कानावर पडताहेत, ऐकून अस्वस्थ अशांत आहे कारण काहीही झाले तरी फडणवीसांचे सत्तेतून किंवा राज्याबाहेर थेट दिल्लीत जाणे, या राज्याला अजिबात परवडणारे नाही त्यातूनच एकप्रकारची असुरक्षितता विशेषतः हिंदू आणि मराठी लोकांच्या हृदयात दाटून आलेली आहे, असे अजिबात घडता कामा नये हेच ज्याला त्याला प्रत्येकाला वाटते आहे….

– हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तिरंगा जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन, राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान

Mon Jan 23 , 2023
नागपूर :- राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन सेन्साई संजय इंगोले (कराटे NSKA-मुख्य प्रशिक्षक) यांनी आज केले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “नाग स्वराज फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com