राम गणेश गडकरी अमर रहे च्या जयघोषानी दुमदुमली नगरी

थोर साहित्यिक, नाटककार, लेखक कै.राम गणेश गडकरी यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला स्मरण करुण विविध संघटना मार्फत भावपुर्वक श्रध्दांजली वाहण्यात आली

सावनेर :- थोर नाटककार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथी निमित्ताने गणेश वाचनालय, गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती निलयम, राम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,व्यापारी संघ, आकार रंगभूमी,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ,सामाजिक संस्था तसेच सेकडो गडकरी प्रेमी आदींच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांनी निवासस्थान, गणेश वाचनालय, समाधीस्थळ, पुतळा आदी स्थानावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

प्रसिद्ध नाटककार,साहित्यिक,भाषाप्रभू तसेच शेक्सपिअर नावाने नावाजलेले कै राम गणेश गडकरी यांचा वारसा जपणाऱ्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कै. राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथी निमित्ताने भावपूर्ण आदरांजली वाहिली.

स्व.राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त नागपूरच्या पुरातत्व विभागाने गडकरी निवासस्थानाला सुंदर पुष्पहार व विद्युत रोषणाईने सुशोभित केले होते, तर समाधी स्थळ व पुतळा नगरपालिका सावनेरच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली.

स्व.राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथी निमित्त प्रथम गणेश वाचनालय सावनेर येथे डॉ.चंद्रशेखर बरेठिया, डॉ.विजय धोटे, समाजसेवक गोपाल घटे आदींच्या उपस्थितीत राम गणेश गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले, सचिव प्रथमेश देशपांडे, मुकेश झारबडे, राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे, सचिव प्रा. विजय टेकाडे व शिक्षक, गडकरी स्मृती निलयमचे श्याम धोटे,आकार रंगभूमीचे आकाश पौनीकर व दैनिक निर्भीडचे संपादक पांडुरंग भोंगाडे, पत्रकार दीपक कटारे, पियुष झिंजुवाडिया व इतर गडकरीप्रेमी. स्वर्गीय राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीला स्मरण करुण श्रध्दांजली वाहली तर राम गणेश गडकरी वाचनालयाचे माजी अध्यक्ष अँड् श्रीकांत पांडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद जैन, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.विजय धोटे, गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले, राम गणेश गडकरी महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे, अँड्. पल्लवी मुलमुले आदींनी याप्रसंगी आपले विचार मांडून राम गणेश गडकरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच राम गणेश गडकरी वाचनालयाचे अध्यक्ष अँड्.चंद्रशेखर बरेठिया यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचन कक्षात उपलब्ध पुस्तके, ग्रंथ व स्पर्धात्मक पुस्तकांची माहिती देत त्याचा जास्तीत जास्त उपयोग घेण्याची विनंती केली.

कै.राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथी प्रसंगी गडकरी पुतळा व समाधी स्थळांला नगरपरिषद सावनेर तर्फे सुशोभित करण्यात आले, त्याच प्रमाणे पुरातत्व विभाग नागपूर तर्फे गडकरी निवासस्थानाला फुलांनी व विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली.

याप्रसंगी राम गणेश गडकरी वाचनालयचे माजी अध्यक्ष श्रीकांत पांडे, माजी नगराध्यक्ष अँड्.अरविंद लोधी,पल्लवी मुलमुले, शंकर ढोके, सुधाकर दहीकर, रघुनंदन जामदार, संजय बन, राजपुते, सचिन नेते, सुमित चौधरी, प्रशांत जामदार,राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य शोभा ताजने,प्रा. बोरीकर, प्रा.बावणे, प्रा.फरकाडे, घुगल, प्रा.निखाडे, प्रा.गायकवाड, प्रा. ठाकरे , प्रा.देशमुख , प्रा.उमाटे , प्रा. धांडोळे , प्रा.पानतावणे, प्रा. मोवाडे , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अँड्. पुरे यांनी तर आभार गडकरी स्मृती निलयमचे अध्यक्ष श्याम धोटे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १०० कोटी ना.नितीन गडकरींच्या संकल्पनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा, पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे ज्ल्लोषात समापन

Mon Jan 23 , 2023
द ग्रेट खलींची विशेष उपस्थिती, अंकित तिवारींच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाने नागपूर शहरातील क्रीडा विश्वाला नवी उंची दिली. आपल्या शहरातील क्रीडा विश्वाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील मैदानांच्या विकासाची संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेला राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य असून नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १०० कोटी देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com