पोरवाल महाविद्यालयातील विलास पजई यांचा चालण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकासह विजय 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नुकत्याच 21 जानेवारीला विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर येथे झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत विदर्भ स्तरीय मास्टर्स मैदानी स्पर्धेत विलास पजई, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी यांनी 5 किलोमीटर पायी चालणे पुरुष वय 45+50 या गटातील स्पर्धेत पहिला क्रमांक सुवर्ण पदकासह पटकावला आहे .

या स्पर्धेसाठी विदर्भातील तमाम पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी म्हणून पोरवाल महाविद्यालयातील शिपाई विलास जी .पजई  यांनी मागील वर्षीपासूनच पहिला क्रमांक मिळवायचा या जिद्दीने जिवापाड मेहनत घेतली होती.

विलास पजई यांच्या विजयाबद्दल  महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गातून कौतुक होत आहे.विशेषता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.विनय चव्हाण यांनी विलास पजई यांचे हा विजश्री प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन केले असून महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.रेणू तिवारी आणि उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवर्ती यांनी सुद्धा विलास पजई यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. शिवाय महाविद्यालयाचे प्रबंधक स्वप्नील राठोड यांनी सुद्धा विलास पजई यांचे अभिनंदन केले आहे.महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत बांबल, डॉ. जयंत रामटेके,डॉ. इंद्रजित बासू, प्रा. मल्लिका नागपुरे यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा विलास पजई यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com