स्वातंत्रलढ़यात नेताजींचे योगदान अमूल्य – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात

कामठी :-देशाच्या स्वातंत्र लढयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अमूल्य असून मवाळ आणि जहाल या दोन्ही परस्पर विरोधी भूमिका असूनही नेताजींच्या सेनेने आपल्या डाव पेचानी ब्रिटिशाना स्वातंत्र देण्यास भाग पाडले असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

येथील नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती समितिच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, माजी जी प सदस्य अनिल निधान,माजी आमदार देवराव रडके, आयोजन समिति चे अध्यक्ष अजय अग्रवाल, लाला खंडेलवाल ,रणाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते .

नेताजीच्या आठवणी निमित्त केंद्र शासनाने नेताजी जयंती पराक्रम दिन म्हणून घोषित केला असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले,या वेळी खासगी व नगर परिषदच्या अब्दुल सत्तार फारुकी उर्दू प्राथमिक शाळाचे विद्यार्थी आकर्षक वेशभुशेत उपस्थित होते.कार्यक्रमच्या प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला मान्यवरानी माल्यार्पण करून राष्ट्र ध्वज फड़काविला.

कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी लाला खंडेलवाल, डॉ विवेक चंदनानी, प्रदीप मिश्रा, नितेश खेतान, निरज अग्रवाल, जयप्रकाश तिवारी,अशोक अग्रवाल, रितेश चौरसिया,गोपाल चव्हान, रामजी शर्मा, सुदेश अग्रवाल, राजू भूटानी, सौरभ अग्रवाल, योगेश शर्मा यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची राज्यपाल यांची माहिती

Mon Jan 23 , 2023
– राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची दिली माहिती मुंबई :- नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com