संदीप बलवीर, प्रतिनिधी
– संपूर्ण गावावर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे करडी नजर
– गुन्हेगारी तसेच अवैध धंद्यावर लागणार लगाम
– सरपंच योगेश सातपुते यांचा पुढाकार
नागपूर :- सातगाव परिसरात वाढलेली गेन्हेगारी व अवैद्य धंद्यावर आळा घालण्यासाठी परिसरातील येणाऱ्या मुख्य मार्गावरील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण सातगाव मध्ये ग्रामपंचायत सातगावच्या माध्यमातून व सरपंच योगेश सातपुते यांच्या पुढाकाराने एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात लावण्यात येणार आहे.
परिसरातिल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय,आठवडी बाजार परिसर,बस स्थानक,जिल्हा परिषद शाळा व गावातील मुख्य रस्ते व चौकात असा मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येईल.
गावात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने या परिसरात गुन्हेगारांना चांगलाच फायदा होताना दिसून येत आहे. रात्री बेरात्री चोरी ,दुकानलाईन चे शटर फोडणे,मोबाईल चोरणे, बाजारात छेडछाड,विनयभंग,आदी घडना मध्ये वाढ झाली.या घटनांचा सुगावा लावण्यासाठी या तिसऱ्या डोळ्याचा प्रशासनाला नक्कीच फायदा होईल.
सातगाव हे बुटीबोरी औधोगिक क्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.त्यामुळे या औधोगिक क्षेत्रात काम करणारा कामगार वर्ग सुद्धा भरपूर आहे.त्यामुळे सकाळी सहा ते रात्री दहा वाजता पर्यंत कामावरून घरी परतणाऱ्या महिला कामगार,शाळा व महाविद्यालयीन तरुणी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही कॅमेरे फार उपयोगी पडणार असल्याचे मत सरपंच योगेश सातपुते यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर ग्रा प कार्यालयात होणाऱ्या लाच लुचपत प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कामकाज सुद्धा सीसीटीव्ही च्या करड्या नजरेत होणार असल्याचे सांगितले.
@ फाईल फोटो