नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.22) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.72, शंकरनगर येथील सुरेन्द्र वाधवा यांच्याविरुध्द बांधकामादरम्यान वाहन भरुन मनपाची सांडपाण्याची लाईन फोडल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत […]

कुठल्याही परिस्थितीत विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच ! – सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार नागपूर :-  गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण आम्ही हटवणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाची बाजी लावून गडकिल्ले जिंकले आहेत. आपण कायद्याची बाजू लावून धरणार आणि गडांवरील अतिक्रमणे हटवणारच. एकशेएक टक्के आम्ही गडावरील अतिक्रमणे हटवू. अनधिकृत बांधकाम करणार्‍यांकडून विरोध होत असला, तरी सरकार अतिक्रमण हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, याविषयी आमचा […]

शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगार, महागाई, व सामान्य जनतेच्या मागण्यासाठी विधानभवनावर आम आदमी पार्टीचा ‘आपला महामोर्चा’ नागपूर :-आम आदमी पार्टी महाराष्ट्राचा आज भव्य आपला महामोर्चा हा नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आला. हा मोर्चा महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. या महामोर्चात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिन्दे, राज्य उपाध्यक्ष धनराज वंजारी […]

नागपूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्यशासन कार्य करीत आहे. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये सुरु असलेले संशोधन कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासन कृषी विद्यापीठांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन कृषीमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांनी दिले.         डॉ. पंजाबराव देशमुख […]

भंडारा :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे. जानेवारी 2023 मध्ये प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्तीला 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ व अंत्योदय प्रति शिधापत्रिका लाभार्थ्यांना 5 किलो गहु, 30 किलो तांदूळ व 1 किलो साखर शिधावस्तुचे वितरण उपलब्ध करण्यात येईल, […]

नागपूर : वाढवण बंदर हे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या बंदराचा विकास करतांना स्थानिक मच्छिमार, शेतकरी यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक तो निधी व यंत्रणा उपलब्ध करुन देण्याबरोबरच स्थानिकांचे सर्व प्रश्न चर्चेतून सोडविणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. वाढवण (जि. पालघर) बंदरात स्थानिक शेतकरी व मच्छिमारांचा विरोध होत असल्याबाबत सदस्य कपिल पाटील, सचिन […]

नागपूर : राज्यातील 142 ठिकाणी तसेच शहरी भागात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. ठाणे, भिवंडी, मालेगाव, वसई विरार अशा विविध ठिकाणी उपयोजना करण्यासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत गोवर आजाराची रुग्ण संख्या 100 टक्के आटोक्यात आणू, असे सार्वजनिक आरोग्य आणि […]

नागपूर : “पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी नियम ९४ अन्वये उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. ते […]

नागपूर : महावितरण कंपनीमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक कामगारांची जवळपास २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता, प्रश्नाला […]

नागपूर दि. २२ : “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे. या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एस आय टी) करण्यात येईल”, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

नागपूर दि. २३ डिसेंबर :- सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला […]

वाडी (प्र): नुकत्याच संपन्न झालेल्या लाव्हा ग्रामपंचायत निवडणूकीत बसपा समर्थीत ग्राम विकास लोकसेवा युवा पॅनल चे संतोष शेंडे,शीला गोलाईत,मनीषा कुंभरे,शारदा मरस्कोल्हे इत्यादी उमेदवार विजयी झाले. या विजयी उमेदवारांचे राजकुमार बोरकर,नरेंद्र मेंढें, सुधाकर सोनपिंपळे,गोपाल मेश्राम, मनोज भोरगडे, काशीनाथ भोयर, विमल डोंगरे,विनोद मेश्राम,मनोज खोरगडे,निलेश मेश्राम, लोकलाल खंडाते, आकाश डोंगरे,आकाश धमगाये,अमोल निंबुलकर,चंदू तांगडे,संदिप पटले,निलेश धामने,सुमेध ऊके, अजित ऊके,प्रंशात परिपवार,संतोष गोमासे, दुर्गा कुलसुंगे, शिला […]

सोमवारी सीमा प्रश्नावर सरकारला ठराव घ्यायला भाग पाडू – अजित पवार नागपूर दि. २३ डिसेंबर :- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती परंतु आज […]

नागपूर, दि. 23 : जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 27 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत सदस्य सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांबाबत लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी […]

नागपूर दिनांक २३: पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्यायालयीन आदेश तपासून आणि निर्णयाचा आदर राखून काही मार्ग काढता येईल का, या संदर्भात शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. विधानसभा सदस्य सुनील […]

नागपूर, दि. 23 : लोकशाहीत लोकप्रतिनिधीबद्दल लोकांच्या मनात पुरेसा विश्वास असेल तरच जनता आणि प्रतिनिधी यांच्यात संवाद टिकून राहू शकतो आणि त्यातून संपूर्ण समाजाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ […]

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून राज्याच्या, देशाच्या राजकारणात सुसंस्कृत व अभ्यासू युवापिढी राजकारणात येईल. राज्याच्या व देशाच्या राजकारणात ही युवापिढी महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी व्यक्त केला. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर […]

नवी दिल्ली :-गेल्या तीन वर्षांमध्ये म्हणजेच, 2019-20 ते 2021-22 दरम्यान, देशभरातली जवळजवळ 40,000 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, यामध्ये बिहारमधील 175 महिलांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामधून दिली. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रशिक्षण दिलेल्या बिहारमधील महिलांचे, विविध समुदायानुसार वर्गीकरण पुढील प्रमाणे: मुस्लिम-175, ख्रिश्चन-0, शीख-0, बौद्ध-0, जैन-0 आणि बिगर-अल्पसंख्याक-0. मंत्रालयाने […]

मनपा आयुक्तांचे आदेश : १६ जानेवारी २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद नागपूर :- नागपूर महानगरपालिकेव्दारे साऊथ सिवरेज प्रकल्प झोन क्र. ५ मधील प्रभाग क्र. २७ राजेंन्द्र नगर चौक ते नंदनवन झोपडपट्टी नागनदी पर्यंत मुख्य गडर लाईन करण्याचे काम प्रस्तावित केले आहे. सदर कामाकरीता या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करणे आवश्यक असून राजेंन्द्र नगर चौकातील वाहतुकीसाठी एकतर्फा रस्ता बंद करण्याचे आदेश […]

– जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन  – खेळाडूंच्या सुविधेसाठी सहा क्षेत्रीय कार्यालये नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरातील खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. मागील चार वर्षापासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाला येत्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. नागपूर शहरातील खेळाडूंचा आपल्या हक्काचा महोत्सव असलेल्या खासदार क्रीडा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com