गाणार नागो पुंडलीक यांना भरघोस बहुमताने विजयी करा – भाजप पदाधिकारी अनिल निधान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

जुन्‍या पेंशन योजनेककरिता १२ वर्षांचा दीर्घ लढा देणारे नागो गाणार

कामठी ता प्र :- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षक परिषद पुरस्‍कृत तथा भारतीय जनता पार्टी व महायुती समर्थीत अधिकृत उमेदवार  गाणार नागो पुंडलिक हे कायम शिक्षकांचे हित जोपासणारे अभ्‍यासू व चारित्र्यसंपन्‍न असे सुयोग्‍य उमेदवार आहे. यांना बहुमताने विजयी करण्‍याचे आवाहन भाजप पदाधिकारी व माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी केले आहे.

नागो गाणार यांनी कायम शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांच्‍या समस्‍या, शिक्षण विषयक विधेयकांची अभ्‍यासपूर्ण मांडणी करून विधीमंडळात शिक्षण क्षेत्राकरिता उपयुक्‍त असे विविध सांसदीय आयुधांचा वापर करून शासनाला सुधारणा करण्‍यास भाग पाडले आहे. अशा अभ्‍यासु उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा असेही भाजप पदाधिकारी व माजी जी प सदस्य अनिल निधान म्‍हणाले. नागो गाणार हे सातत्‍याने शिक्षकांच्‍या हक्‍कांसाठी सजगपणे लढा देत आहे. विधानपरिषदेतील अभ्‍यासू उमेदवार म्‍हणून नागो गाणार यांची ओळख आहे. शिक्षकांच्‍या हक्‍कासाठी पोटतिडकीने ते आपली भुमीका कायम मांडत आले आहे. शिक्षकांच्या जुनी पेंशन योजनेकरिता ते आग्रही भुमीका घेत आहेत. शिक्षकांचे प्रश्‍न सोडवित असताना सत्‍ताधारी पक्ष कोणता आहे हे सुध्‍दा ते बघत नाही व शिक्षकांच्‍या हक्‍कांसाठी कायमच लढा देत आहेत. शिक्षण संस्‍थांचे व्‍यवस्‍थापन आणि शिक्षकांचे प्रश्‍न सोडविताना ते कोणाचीही तमा बाळगत नाही. नागो गाणार २४ कॅरेट सोने आहे. त्‍यांनी कधीही जाती, धर्माचे राजकारण केले नाही. केवळ शिक्षण व शिक्षकांच्‍या उन्‍नतीकरिता सातत्‍याने कार्य करीत आहेत.

सध्‍या जुन्‍या पेंशन योजनेबद्दल विरोधी पक्षाकडून भ्रम पसरविण्‍यात येतो आहे. २००५ साली महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी पक्षाची सत्‍ता असताना जुनी पेंशन योजना रद्द करण्‍यात आली. त्‍यावेळी विधानपरिषदेमध्‍ये कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या शिक्षक मतदार संघातील आमदारांनी साधा ‘ब्र’  सुध्‍दा काढला नाही आणि आता मात्र त्‍यांना जुन्‍या पेंशन योजनेबद्दल फारच पुळका येत आहे. राज्‍यामध्‍ये शिवसेना-कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकार असताना जुनी पेंशन योजना लागू करण्‍याकरिता कोणताही ठोस निर्णय घेतला नाही आणि आता मतदारांना भ्रमीत करण्‍यात येत आहे, परंतु शिक्षक मतदार हा जागृत आहे. त्‍याला माहित आहे जुनी पेंशन योजना बंद करण्‍याचे पाप २००५ साली कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी सरकारने केले आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या भ्रमाला जागृत शिक्षक मतदार बळी पडणार नाही आहे. शिंदे-फडणवीस सरकार जुनी पेंशन योजना लागू करण्‍याकरिता त्‍यावर काम करीत आहेत.

मागील १२ वर्षांच्‍या आपल्‍या आमदारकीच्‍या काळात  नागो गाणार यांनी जुनी पेंशन योजना सुरू करण्‍याकरिता अभ्‍यासपूर्ण सातत्‍याने संघर्ष केला आहे. जो पर्यंत जुनी पेंशन योजना सुरू होणार नाही तोपर्यंत मी पेंशन घेणार नाही, असे जाहीर करून ते स्वतः पेंशन घेत नाही आहेत. त्‍यामुळे येत्‍या ३० जानेवारी २०२३ रोजी होणा-या शिक्षक मतदार संघाच्‍या निवडणूकीमध्‍ये स्‍वच्‍छ चारित्र, गुणवत्‍तासंपन्‍न, शांत, संय्यमीवृत्‍ती, ज्ञानसाधना व ध्‍येयनिष्‍ठा जपत शिक्षकांच्‍या न्‍याय्य हक्‍कांसाठी सदैव लढणारे व्‍यक्‍तीमत्‍व श्री. गाणार नागो पुंडलीक यांना प्रथम क्रमाकांचे मतदान करून भरघोस मताने विजयी करण्‍याकरिता सर्व शिक्षण संस्‍थेतील मतदार शिक्षक बंधू-भगिनींनी त्‍यांना मतदान करावे असे आवाहन भाजप पदाधिकारी अनिल निधान यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mon Jan 30 , 2023
मुंबई : शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.           नाशिक येथील डोंगरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com