बेपत्ता इसमाचा मृतदेहच आढळला..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 28 :- येथील रब्बानी शाळेजवळील रहिवासी एक 60 वर्षोय इसम मागील चार दिवसांपासून बेपत्ता होता.घरमंडळींनी बराच शोध घेऊनही कुठेही थांगपत्ता लागला नव्हता तर आज सकाळी 7 दरम्यान कमसरी बाजार स्थित मलंगशाह दरगाह परिसरात सदर बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेत चक्क मृतदेहच आढळल्याची घटना निदर्शनास आली असून मृतकाचे नाव निसार अहमद वय 60 वर्षे रा गोलबाजार कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पिल्ले, राजू टाकळकर यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नाही तरीसुद्धा त्यांचा मृत्यू हा भुकेच्या व्याकुळतेने झाला असावा असा तर्क लावण्यात येत आहे.मृतक हा अजूनही अविवाहित होता हे इथं विशेष!

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com