प्रजासत्ताक दिनी कामठीच्या नवरदेवाची घोड्यावर चढण्यापूर्वी ध्वजारोहन.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 27 :- कामठी रहिवासी बिल्लरवान कुटुंबातील नवरदेवाने घोड्यावर चढण्यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन केलं. यावेळी नवरदेवाने संपूर्ण कुटुंबासोबत ध्वजवंदन केलं आणि मग लग्न मांडवात गेले.

संपूर्ण देशात 26 जानेवारीला 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्याचवेळी कामठीतील प्रजासत्ताक दिन एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला. आपल्याला लग्न म्हटलं की डोळ्यासमोर बँड, बाजा आणि बारात हेच येतं. मात्र काल 26 जानेवारीला बिल्लरवान कुटुंबीयांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या लग्नाची सुरुवात आगळ्यावेगळ्या पद्धतीने केली. येथे नवरदेव झालेल्या घनश्याम उर्फ रोहित दिनेश बिल्लरवान ने आधी ध्वजारोहण केलं आणि नंतरच त्यांनी वरात पुढे नेऊन मंडपात पाय ठेवला. त्यामुळे या घनश्याम उर्फ रोहित च्या लग्नाने सर्वांचे लक्ष्य आकर्षित केले.

लग्न म्हटलं की हळद,मेहंदी,संगीत,वरात आणि धम्माल .पण समाजसेववक दिनेश बिल्लरवान आणि रचना दिनेश बिल्लरवानचा मुलगा घनश्याम उर्फ रोहित या नवरदेवाने आधी ध्वजवंदन नंतर लग्नाची वरात पुढे नेऊन लग्नमंडपात गेल्याने समाजापुढे देशभक्तीचा आदर्श ठेवत स्वतःच्या लग्नाची एक वेगळी ओळख केली.

लग्न मंडपी जाताना वर-वधूला मतदान करुन जाताना आपण नेहमीच पाहतो. मात्र, कामठी रहिवासी बिल्लरवान कुटुंबातील रोहित बिल्लरवान ने लग्न मंडपी जान्यापूर्वी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहन करत देशाच्या संविधानाला बळकट करण्याचं काम करत सामाजिक संदेश दिला आहे.त्यातच नवरदेवाहसह समस्त कुटुंबीयांनी देशभक्तीपर वेशभूषा करून सहभागी झाल्याने एक आकर्षण ठरले होते.

२६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना अमलात आली. त्यामुळे या दिनाची सार्वांना आठवण राहावी यासाठी घनश्याम उर्फ रोहित दिनेश बिल्लरवान या नवरदेवाने लग्न मडंपी जान्यापूर्वी 73 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन केले. तर बिल्लरवान कुटुंबातील वऱ्हाड्यांनी यावेळी राष्ट्रगान करत तिरंग्याला मानवंदना देत सामाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. लग्नापूर्वी ध्वजारोहण करण्याची संकल्पना ही नवरदेवाचे वडील दिनेश बिल्लरवान यांची होती त्यानुसार रोहित चे लग्न आयोजित करून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करून नवरदेवाची वरात कामठी हुन मध्यप्रदेश राज्यातील सारणी येथे रवाना झाली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com