सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी मतदार नोंदणी व जागृकता दिवस संपन्न 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानीय सेठ केसरीमल पोरवाल कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मध्ये 25 जानेवारी 2023 रोजी राज्यशास्त्र विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग,तसेच तहसील कार्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसील कार्यालय कामठीचे नायब तहसीलदार राजाराम बमनोते तसेच अक्षय नागे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. विनय चव्हाण हे होते. विचारपीठावर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, लेडी ऑफिसर डॉ. निशिता अंबादे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.संजीव शिरपूरकर यांनी केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मताचे मूल्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजाराम बमनोटे, नायब तहसीलदार कामठी यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपल्या मताचा राष्ट्र निर्माण साठी उपयोग झाला पाहिजे असा वापर करायला शिकले पाहिजे असे सांगितले. दुसरे पाहुणे  अक्षय नागे नायब तहसीलदार कामठी यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून विदेशातील स्त्री मतदारांना आपला मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला हे सांगितले. तर भारतात संविधान लागू झाल्यापासून सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला हे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रो.डॉ.विनय चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करून राष्ट्र निर्माणमध्ये आपली महत्वाची भूमिका बजावावी आणि लोकशाही व्यवस्थेला बळकट करावे असे आवाहन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जोगी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद शेंडे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. इंद्रजित बसू यांनी विशेष सहकार्य केले तर हिंदी विभाग प्रमुख  डॉ. विकास कामडी यांनी विशेष सहयोग देऊन  विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील तीनही विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com