संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना केवळ मात्र 25 वर्षे जीवन जगता आले .आदीवासीच्या एका क्रांतिकारी तरुणाने ब्रिटिश सत्तेला मोठ्या प्रमाणात हादरे दिले.सण 1984 चा वन शुल्क लढा,जल,जंगल,जमीन यावर सर्वप्रथम आदिवासींचा हक्क आहे .आम्ही या देशाचे मालक आहोत .आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर देणार नाही अशा प्रकारचा उलगुलांनचा नारा बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला दिला.एक नेतृत्व, कुशल संघटक म्हणून बिरसा मुंडा पुढे आला.ही भूमी सोडून इंग्रजांनी चालते व्हावे आमचे राज्य आमच्या स्वाधिन करावे अशी ललकारी इंग्रजांना दिली. भारताच्या संसदेने मरणोपरांत स्वर्गीय राजीव गांधी यांना क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुरस्कार जाहीर केला.तेव्हा बिरसा मुंडा संपूर्ण जगाला कळला.अशाप्रकारे बिरसा मुंडा यांचे कार्य घराघरात पोहोचविण्याचे आवाहन शिवसेना नागपूर जिल्हा उपप्रमुख राजन सिंह यांनी कामठी येथील शिवसेना कामठी मौदा विधानसभा जनसंपर्क कार्यालयात आयोजित क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन शर्मा ,जनसेवक प्रतीक पडोळे , कामठी शहर प्रमुख शुभम तडसे ,आशिष जैन , गणेश सायरे, संदीप धाबाळे ,श्यामली बागडे ,सतीश अत्राम , गजूजी फुलबांधे , सहील नकवे,सुशील शेरेकर ,योगेश श्रीकुंद्वर, व्यंकटेश बढेल,आनंद उके ,पूजा खोब्रागडे,निलेश उईके सतीश मरसकोले, यासह शिवसेनाचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.