नागपूर :-फिर्यादी पोलीस अंमलदार प्रफुल जगदेवराव धर्माळे, वय ४२ वर्षे, रा. नेसखेडा, पोस्ट बोराडा, ता. चांदुरबाजार, जि. अमरावती हे मोटार परिवहन विभाग नागपुर शहर येथे वाहन चालक या पदावर कार्यरत असुन, सध्या ते सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे वाहनावर चालक म्हणुन नेमणुकीस आहेत.
दिनांक १५.०३.२०२४ चे ०९.१५ वा. चे दरम्यान फिर्यादी हे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना शासकीय वाहन क्र. एम. एच १२ आर. के ५५३७ ने शासकीय कामानिमीत्त पोलीस ठाणे कपिलनगर येथे सोडुन, शा. वाहन पोलीस ठाणे बाहेर पार्क करून साफ करत होते. त्या दरम्यान एक अनोळखी ईसम हातात लोखंडी कुन्हाड घेवुन आला व काही न बोलता फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देश्याने त्यांचेवर लोखंडी कुन्हाडीने दोन वेळा डोक्यावर वार केल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले. नमुद अनोळखी ईसमाने तिसरा वार केला असता, तो चुकवुन फिर्यादीने स्वःता बचाव करून त्या इसमास धक्का दिला. पोलीस ठाणेचे ईतर कर्मचारी यांनी नमुद घटना घडली तेव्हा, धावत येवुन त्या अनोळखी ईसमास पकडुन ताब्यात घेतले. पोलीस ठाणेतील पोहवा. पुरुषोत्तम सहारे यांनी ताब्यातील ईसमास नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव दिलीप रामराव चिनकुरे, वय ५३ वर्षे, रा. लॉट नं. ३०४, एन.आय.टी क्वॉर्टर, हनुमान मंदीर जवळ, कपिलनगर, नागपुर असे सांगीतले. जखमी फिर्यादीचा उपचार होप हॉस्पीटल येथे सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कपीलनगर येथे पोउपनि, ताळीकोटे यांनी आरोपीविरूध्द कलम ३०७, ३३३, ३५३ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करून, आरोपीस ताब्यात घेतले आहे. ताब्यातील ईसमाचे हावभाव व वागणुकीवरून तो मनोरूग्न असल्याचे प्राथमिकरित्या दिसुन येत असल्याने, त्यास वैद्यकीय तपासणी करीता मेयो हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.