संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत लाभ हस्तांतरणाचे प्राथमिक उद्दिष्ट केंद्र सरकारने प्रायोजित केले आहे.निधीच्या वितरणात पारदर्शकता आणणे ,चोरी व बोगस लाभार्थ्यांची यादी संपविणे हा त्यामागचा डी बीटी चा मुख्य उद्देश आहे.त्यानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे शासनाने 30 मे पर्यंत या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना गावातील जवळचे तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे कागदपत्र जमा करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र खाते बंद होण्याच्या भीतीने बहुतांश लाभार्थी या रखरखत्या उन्हात स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा न करता कामठी तहसील कार्यालयात पायपीट करीत आहेत.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थीसाठी पूर्वी कामठी तहसील कार्यालय मार्फत लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकेला पाठवून त्यानुसार हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात होता.यामुळे नेहमीच या प्रक्रियेला नेहमीच उशीर व्हायचा ,योजनेचे लाभार्थी बँकेच्या चकरा मारत असायचे त्यामुळे वरिष्ठ नागरिक ,अपंग ,वृद्ध, महिला अनाथ बालक यांना बँकेत जाऊन कर्मचाऱ्यांची बराच वेळ पाहावी लागत असे परंतु आता 30 मे नंतर आता या लाभार्थ्यांचे अनुदान सरळ थेट डीबीटी मार्फत थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना बँकेच्या चकरा मारायची गरज भासणार नाही मात्र यामुळे केवायसी करणे गरजेचे आहे यासाठी काही लाभार्थ्यांनी गावातील पटवारी कडे फॉर्म व कागदपत्र जमा केले मात्र शहरासह इतर ग्रामीण भागातील लाभार्थी अजूनही भर उन्हात कामठी तहसील कार्यालयात अर्ज व कागदपत्र जमा करण्यासाठी तहसील कार्यालया च्या चकरा मारत आहेत तेव्हा यासंदर्भात उन्हाचा प्रकोप लक्षात घेता लाभार्थ्यांना डीबीटी ची दिलेल्या मुदतीत शिथिलता आणावी व कागदपत्र जमा करण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी येथील काही जागरूक नागरिकांनी केली आहे यावर नायब तहसिलदार साधनकर यांनी 10 जून पर्यंत कागदपत्र जमा करू शकतात असे सांगितले.
– संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांनी हयात किंवा जिवंत प्रमाणपत्र ,आधार कार्ड,बँकेचे पासबुक,आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक हे सर्व कागदपत्र जमा केल्या नंतरच लाभार्थीना अनुदान देण्यात येईल यामुळे लाभार्थ्यांनी दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.