इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पुस्तकांचे विमोचन

नागपूर :- येथील हनुमाननगर स्थित इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. जयदीप घोष व प्रा. डॉ. रमेश बन्सोड यांचे प्रत्येकी दोन पुस्तकांचे विमोचन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष, अरूण जोशी, श्री पंढरीनाथ कला-वाणिज्य महाविद्यालय, नरखेडचे प्रा. डॉ. समीर पाहुणे, प्रा. डॉ. बाबुलाल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थित पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

डॉ. जयदीप घोष यांनी लिहिलेल्या 1) हेल्थ एज्युकेशन अ‍ॅन्ड इनवायरमेंटल स्टडीज, 2) स्पोर्टस् सायकोलॉजी अन्ड सोशिओलॉजी तसेच डॉ. रमेश बन्सोड यांनी लिहिलेल्या 1) स्वास्थ्य शिक्षा तथा पर्यावरण अध्ययन, 2) निर्णयन तथा अधिशिक्षा या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित अतिथींनी पुस्तके विद्यार्थ्यांना कशी उपयुक्त आहेत यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दत्तात्रय करांगळे, कैलास शेजोळे व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com