अमरदिप बडगे , प्रतिनिधी
गोंदिया – येथील रेल्वे रेल्वेस्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन क्रमांक २२८१५ एर्नाकुलम एक्सप्रेस दुपारी १:४९ वाजता आली आणि १:५२ सुटली असुन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना, एक महिला प्रवासी स्लीपर कोचमध्ये प्लॅटफॉर्मवर पडली आणि दुसरी महिला प्रवाशी एस – ४ कोचच्या दारात उभ्या असलेल्या पतीची कंबर धरून ती ट्रेनसोबत ओढत जात होता, ती ट्रेनखाली पडत असतांना स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ जवान प्रमोद कुमार यांनी तत्परता दाखवून तातडीने त्या महिलेला सुरक्षितपणे स्वत:कडे खेचले आणि ट्रेनच्या खाली जाण्यास वाचवले.