-‘पीरिपा’तर्फे नामांतर शहिदांना मानवंदना
-नामांतर लाँगमार्च चा ४४ वा वर्धापन दिन
नागपुर :- जवळपास सोळा वर्ष संघर्ष केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी बाबासाहेबांच्या अनुयांनी संघर्ष केला. नामांतराच्या या संघर्षात २० जणांनी बलीदान दिले. आंबेडकरी जनतेच्या १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर यश मिळून अखेरीस १४ जानेवारी १९९४ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’असे नामांतर अस्तीत्वात आले. असे प्रतिपादन नागपुरात लाँग मार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नागपुरात रामबाग इमामवाडा येथील लाँगमार्च चौकातील स्मारकस्थळी अभिवादन स्थळी केले. लाँग मार्चच्या या ४४ वा वर्धापन दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यासह नागपुरात शहिदांना मानवंदना देण्यात आली. शनिवारी सकाळी अकरा अभिवदान सभेला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, जेष्ठ साहित्यिक ताराचंद खांडेकर, कवि ई. मो.नारनवरे, महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, युवक आघाडी प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी, नागपुर शहर अध्यक्ष कैलाश बांबोले आदिंची प्रमुख उपस्थिती शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
पुढे बोलतांना प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, इतिहासाचा साक्षीदार व आंदोलनाचा धगधगती आग नामांतराचे संघर्षाला ४४ वर्षे आज पूर्ण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. नामांतर लढा म्हणजे देशाच्या सामाजिक समतेच्या चळवळीतील सुवर्णाक्षरात नोंदला गेलेला जाज्वल्य इतिहासच आहे. या आंदोलनाच्या उभारणीत आणि यशात नागपूर शहराचे बलिदान मोलाचे आहे. या चळवळीत आत्माहुती देणाऱ्या शहिदांच्या त्यामुळेच नामांतर साकार झाले आहे, असेही प्रा. जोगेंद्र कवाडे सर म्हणाले. यावेळी पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे म्हणाले की, आंबेडकरी जनतेच्या सोळा वर्षाचा अविरत संघर्षानंतरच मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव महाराष्ट्रच्या विधिमंडळाने संमत केला होता सरकारने संमत केलेल्या या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी लॉंगमार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर दीक्षाभूमी ते औरंगाबाद असा ऐतिहासिक लाँग मार्च काढण्यात आला होता. ११ नोव्हेंबर १९७९ रोजी निघालेल्या या लाँग मार्चची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड’मध्ये घेण्यात आल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.
सदर मार्चमुळे राज्यासह देशभरात नामांतराच्या चळवळीने वेग घेवून सर्वत्र राज्य सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली तसेच ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे, धरणे, रास्ता रोको, जेल भरो आंदोलने झाली या आंदोलनादरम्यान जातीयवाद्यांसोबत ठिकठिकाणी उडालेल्या संघर्षात व आंदोलनांमध्ये अनेक ज्ञात-अज्ञात नामांतर वीर शहीद झाले. नामांतरासाठी झालेला अभूतपूर्व लढा व त्यात प्राणाची बाजी लावून लढलेले भीमसैनिक यांच्या त्यागामुळेच नामांतर झाले आहे. या लढ्यात सर्वस्वाचे बलिदान ज्यांनी केले त्या शहिदांना मानाचा मुजरा, असेही कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. अभिवादन सभेला संजय खांडेकर, कुशीनारा सोमकुवर, चंद्रबाबू गायकवाड, प्रज्योत कांबळे, डॉ. सिद्धार्थ कांबळे, स्वप्नील महल्ले, ईश्वर सूर्यवंशी, उरमेश गेडाम, मोरेश्वर गेडाम, प्रमोद लोखंडे, उमराव (बाबा) बोरकर, दिलीप पाटील, दिपक सूर्यवंशी, प्रकाश मेश्राम, महेंद्र नागदेवे, अरूण साखरकर, केवल कांबळे, शेखर बोरकर, भीमराव कळमकर, मनोज वालके, सिद्धार्थ सरदार, गौतम उके, विनय मोटघरे, सुनिता शेंडे, प्रज्ञाशिल धोटे, प्रिती वानखेडे, सुधा मस्के, वैशाली सरदार, सुमन सरदार आदि पीरिपाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.