नागपूर :- पोस्टे खापा येथील स्टाफ पो. स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असता मौजा दुधवर्डी (गडेगाव शिवार) येथे एक लाल रंगाचा ५७५ डी १ सरपंच महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच ४०/वी इ- २१६५ व बिना नंबरची लाल रंगाची ट्रॉली चा चालक आरोपी नामे ईश्वर सेवकराम धुर्वे, वय २८ रा. रंगारीपुरा खापा हा आपल्या ताब्यातील ट्राली मध्ये एक ब्रास रेती वाहतूक करतांना दिसून आल्याने चालक हा पोलीसांना पाहून आपल्या ताब्यातील वाहन सोडून घटना स्थळावरून पळुन गेला. सदर घटनास्थळाहुन एक लाल रंगाचा ५७५ डी १ सरपंच महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच-४०/ बी इ २१६५ व त्याला लागुन असलेले बिना नंबरची लाल रंगाची ट्रॉली किंमती ६,००,०००/- रू व ट्राली मध्ये एक ब्रास रेती किंमती ३०००/- रू तसेच दोन फावडे व दोन घमेले किंमती ४००/- रू असा एकुण ६,०३४००/- रू चा मुद्देमाल जप्त करून चालक आरोपी नामे-१) ईश्वर सेवकराम धुर्वे, वय २८ वर्ष, रा. रंगारीपुरा खापा, मालक नामे २) जगदीश पंढरी भुजाडे, वय ५१ वर्ष, रा. किल्लापुरा खापा यांचा शोध खापा पोलीसांनी घेतला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीतांविरुद्ध पोस्टे खापा येथे कलम ३०३(२) भारतीय न्याय संहीता सहकलम ४८(७), (८) म. ज. म. अधि. सहकलम ४. २१ खान खनिज अधि. १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतीबंधक अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात कलम ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे खापा येथील ठाणेदार सपोनि, सुनिल दहीभाते, पोहवा खोमेश्वर वांबल यांनी पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा नरेश गाते हे करीत आहे.