विकासात कसर ठेवणार नाही – राजश्री पाटील

बाभुळगाव :- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमदेवार राजश्री हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ बाभूळगाव येथे राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते व खा. हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने कायमच भाजपा, शिवसेनेला मोठी साथ दिली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी लोकसभेत महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना निवडून देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्र उभारणीत साथ द्या, असे आवाहन यावेळी आ. डॉ. अशोक उईके यांनी केले.

खासदार हेमंत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करताना, राळेगाव विधानसभेतील राळेगाव, कळंब, बाभूळगाव तालुक्यात पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या साक्षीने नवे विकासपर्व सुरू होईल, अशी ग्वाही दिली. या परिसरात शेती, सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य यासोबतच दळणवळणाच्या जलद सुविधा निर्माण करून मतदारसंघात विकासाच्या बाबतीत कोणतीही कसर राजश्री पाटील ठेवणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, भाजपा विधानसभा प्रमुख सतीश मानलवार, तालुकाध्यक्ष नितीन परडखे, बाभूळगाव नगर पंचायत अध्यक्ष संगीता मालखुरे, शहर प्रमुख अनिकेत पोहकर, भारतीय युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आकाश सोळंके, शिवसेना तालुकाप्रमुख वसंत जाधव, भाजप महामंत्री अविनाश मेहकर, शिवसेना अल्पसं’याक आघाडी जिल्हाप्रमुख शब्बीर खान, बांधकाम सभापती जाकीर खान, नगरसेवक मदिना परवेज, नईम खान, रमेश मोते, शिवसेना शाखाप्रमुख अभिषेक मालखुरे, तालुका प्रमुख महादेव गर्जे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष वसीम मिर्झा, नगरसेवक अमर सिरसाट, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अमन चौधरी, उपाध्यक्ष अनिकेत राऊत, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज भुजाडे, रियाज खान, विद्यार्थी सेनेचे रितेश कांबळेसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या सं’येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Convocation Ceremony for Grade - Preparatory

Mon Apr 15 , 2024
Nagpur :-The Kindergarten Convocation is the culmination that marks the new journey of a child towards higher education where they will be exploring new ideas and things and shaping themselves into tomorrow’s leaders. DPS- MIHAN, organised the Convocation Ceremony for Grade – Preparatory on Saturday, 13th April, 2024. The day’s proceedings began with the traditional lamp lighting ceremony followed by […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com