बीना (संगम) येथील भोई समाजाची अर्चना मेश्राम हीची दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त निवड 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील बिना ( संगम ) येथील धिवर समाजाचे विजय महादेव मेश्राम यांची कन्या अर्चना मेश्राम हिची नवी दिल्ली येथे होणा-या २६ जानेवारी २०२४ हया प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थीनी मधून निवड झाली आहे. अर्चना विजय मेश्राम ही विद्यार्थीनी नागपूर सदर येथील अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालयाची बी.कॉम. अंतीम वर्षाची विद्यार्थीनी आहे. यापुर्वी अर्चना मेश्राम ही महाराष्ट्र लेवल युनिटची विद्यार्थिनी होती. त्यामुळे तिचा समावेश पुणे येथील परेड मध्ये सुध्दा समावेश करण्यात आला होता. हया विद्यार्थीनीचे आई-वडील अशिक्षित व अत्यंत गरीब असुन ही त्यांनी अर्चना च्या अभ्यासाकडे तसेच तिच्या क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले हे विशेष. भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जिवन रक्षक दल चे वतीने अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व मुलीच्या आई व वडिलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोई समाजाचे जेष्ठ नेते व भा. भो. वि.म. चे अध्यक्ष ॲड. दादासाहेब वलथरे, प्रकाश डायरे ॲड. ए. एन. दिघोरे कोषाध्यक्ष, ॲड. प्रांजली हुकरे, उपाध्यक्ष मनोहर भोयर, महासचिव दिलीप मेश्राम, अशोक भोयर, जिवन रक्षक दल चे बिना ( संगम ) येथील अमीत मेश्राम, शालीकराम बोंदरे, सुरेश प्रसाद, प्राची वलयरे, अश्विनी रंगारी, मृणाली वलथरे आदिंनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तेजस बहुउद्देशीय संस्था कामठीच्या वतीने क्रांतिकारक अमर शहीद यांच्या कुटुंबीयांचा केला गौरव 

Wed Jan 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त तेजस बहुउद्देशीय संस्था, कामठी तर्फे छत्रपती शिवाजी चौक, शुक्रवारी बाजार, कामठी येथे क्रांतिकारी अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात चंद्रशेखर आझाद यांचे नातू हेमंतराव मलकपुरकर, भगतसिंग यांच्या लहान भावाचा मुलगा किरण सिंग, बाळ गंगाधर टिळक यांचा नातू शैलेश टिळक, शहीद अशफाक उल्लाह खान यांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com