संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील बिना ( संगम ) येथील धिवर समाजाचे विजय महादेव मेश्राम यांची कन्या अर्चना मेश्राम हिची नवी दिल्ली येथे होणा-या २६ जानेवारी २०२४ हया प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थीनी मधून निवड झाली आहे. अर्चना विजय मेश्राम ही विद्यार्थीनी नागपूर सदर येथील अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालयाची बी.कॉम. अंतीम वर्षाची विद्यार्थीनी आहे. यापुर्वी अर्चना मेश्राम ही महाराष्ट्र लेवल युनिटची विद्यार्थिनी होती. त्यामुळे तिचा समावेश पुणे येथील परेड मध्ये सुध्दा समावेश करण्यात आला होता. हया विद्यार्थीनीचे आई-वडील अशिक्षित व अत्यंत गरीब असुन ही त्यांनी अर्चना च्या अभ्यासाकडे तसेच तिच्या क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले हे विशेष. भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जिवन रक्षक दल चे वतीने अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व मुलीच्या आई व वडिलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोई समाजाचे जेष्ठ नेते व भा. भो. वि.म. चे अध्यक्ष ॲड. दादासाहेब वलथरे, प्रकाश डायरे ॲड. ए. एन. दिघोरे कोषाध्यक्ष, ॲड. प्रांजली हुकरे, उपाध्यक्ष मनोहर भोयर, महासचिव दिलीप मेश्राम, अशोक भोयर, जिवन रक्षक दल चे बिना ( संगम ) येथील अमीत मेश्राम, शालीकराम बोंदरे, सुरेश प्रसाद, प्राची वलयरे, अश्विनी रंगारी, मृणाली वलथरे आदिंनी परिश्रम घेतले.