आनंदाचा शिधा राशन किट वितरणाला सुरुवात 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-भाजपा -शिवसेना सरकार तर्फे गुढ़ीपाडवा सण निमित्त राशन दुकानात प्रत्येक राशनकार्ड धारकाला 1 किलो साखर,1 किलो रवा,1 किलो चना दाल,1 किलो तेल मात्र 100 रुपयात देण्यात येत आहे .

आज रविवार ला अनुसूचित जाती आघाडी भाजपा कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांच्या हस्ते राशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा राशन किट वितरण चा शुभारंभ करण्यात आला ,दुर्गेश ग्राहक सेवा सहकारी संस्था संचालित राशन दुकान संचालक दुर्गेश भाजपा कामठी महामंत्री उज्वल रायबोले ,भाजपा प्रभाग 15 भाजयुमो अध्यक्ष अभिषेक रायबोले,बुथ प्रमुख अरविंद चवडे, बादल कठाने, रोहित दहाट, दिनेश खेडकर,शंकर चवरे तसेच देवका रामटेके, शिला तागड़े, प्रणाली मेश्राम, प्रतिमा रंगारी, रेखा मदनकर, मानसी लोणारे, जालंधर डोंगरे, विक्की कांबळे, संजय लोणारे, सतीश रामटेके, निशा मेश्राम,प्रज्वल सौलंकी आणि अन्य लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

लाभार्थीनी गुढ़ीपाडवाचा सण गोड करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांचे आभार मानले

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com