परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले संघर्षरहित सामाजिक क्रांती निर्माण होणे गरजेचे – न्यायमूर्ती भूषण गवई

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-समाजात सामाजिक ,आर्थिक समानता ठेवण्यासाठी कायद्याच्या नियमाची योग्य अंमलबजावणी करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहेत – न्यायमूर्ती भूषण गवई 

कामठी :- बिडी कामगारांचे हृदय सम्राट कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक लढ्यातील अत्यंत निष्ठावंत ,निर्भीड, निश्चयी,नि:स्पृह व थोर संघर्षशील लोकनेते म्हणून ख्यातीप्राप्त होते प्रसिद्ध होते तर बिडी मजदूर आणि आंबेडकरी चळवळ या दोन्ही आंदोलनातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे तर त्यांच्या चळवळी व आंदोलनात मी खुद्द भूषण गवई तसेच माझी बहिण ऍड. सुलेखा कुंभारे यांचे लहानपण गमावले आहे जे आजही दृष्टीक्षेपास आहे त्यासोबतच कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे हे एक वकील होते .आणि वकिलांच्या भूमिकेतील कार्यकाळात वयाच्या 59 व्या वर्षी त्यांचे अकस्मात निधन झाले. अशा यशस्वी वकिलांच्या कार्यप्रतिआपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो असून समाजात सामाजिक व आर्थिक समानता ठेवण्यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला समर्पित केलेल्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकांनी कायदा नियमाचे योग्य अंमलबजावणी करण्याची गरज असून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले संघर्षरहित सामाजिक क्रांती निर्माण होणे गरजेचे असल्याचे मौलिक मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी नागपूर जिल्हा वकील संघ व ओगावा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील ड्रॅगन पॅलेस कॅम्पस परिसरातील एमटीडीसी सभागृहात कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हा विधिज्ञ संमेलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले .

कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने आज 25 मार्च ला नागपूर जिल्हा वकील संघ व ओगावा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कॅम्पस ,दादासाहेब कुंभारे परिसर एमटीडीसी सभागृहात जिल्हा विधिज्ञ संमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात कायद्याचे राज्य आणि कायद्यापुढे समानता ,महिला विषयीचे कायदे या परिसंवाद विषयावर कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुख्य मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे होत्या.

या संमेलनाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांचे हस्ते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे विधीतज्ञ एडवोकेट फिरदोस मिर्झा, नागपूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे, आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रविना खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले प्राचीन काळात पूर्वी राजा जे आदेश देत होते त्या आदेशाची सर्वीकडे अंमलबजावणी होत होती पण त्याहीपेक्षा भारतीय घटनाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वत्र सामाजिक आर्थिक समानता राहावी याकरिता संविधानानुसार भारतीय घटनेनुसार कृषी ,बँक, सामाजिक ,राजकीय सर्वच क्षेत्रात समानता निर्माण व्हावी याकरिता घटनेत कायद्याची तरतूद करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. त्यामुळे भारतीय न्याय पालिकेत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय ,जिल्हा न्यायालयातून योग्य निर्णय देऊन समाज क्रांती घडत आहे .महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,फातिमा शेख यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून समता, बंधुता ,न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आज समाजात सर्व क्षेत्रात सामाजिक एकता दिसून येत आहे ज्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांची माझी भेट माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी झाली होती तेव्हापासून त्यांच्या कार्यप्रणालीची मला जाणीव असून त्यांनी समाजातील दीनदुबळ्या बिडी कामगार सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव रात्र दिवस झटून उत्तम न्याय देण्याचे महान कार्य केले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन एडवोकेट सुलेखा कुंभारे या सुद्धा समाजकार्य करत आहेत सुलेखा कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या माध्यमातून कामठी नागपूरचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे फार मोठे महानकार्य केले आहेत त्यांच्या या सामाजिक कार्यात आपण सगळ्यांनी सहभागी होऊन त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

कार्यक्रमात प्राचार्य प्रवीण खोब्रागडे मार्गदर्शन करताना म्हणाल्या आजही समाजात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून काही निवडक महिला पुढे आल्या आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार आम्हा सर्वांना समान अधिकार प्राप्त करून दिले आहेत तरी महिलांनी त्या अधिकाराचा उपयोग करून विविध क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उच्च न्यायालयाचे विधी तज्ञ फिरदोस मिर्झा म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार प्रत्येकाला समानतेचा अधिकार प्राप्त करून दिला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून समता, बंधुता, न्यायाचे अधिकार उपलब्ध करून दिल्यामुळे घटनेत समानता मिळाली आहे त्याकरिता प्रत्येक नागरिकांनी कायद्याच्या नियमाचे व अधिकाराचा योग्य उपयोग करून समाज कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर जिल्हा विधी संघाचे अध्यक्ष एडवोकेट रोशन बागडे यांनी केले कार्यक्रमाला नागपूर जिल्हा विधी संघाचे सचिव एडवोकेट एस पांडे माजी अध्यक्ष एडवोकेट कमलचा सतुझा ,ऍड डी सी चहांदे, एड उदय डबले ,कामठी तालुका विधी संघाचे अध्यक्ष एड संजय राव ,उपाध्यक्ष अविनाश भिमटे ,सचिव एड विलास जांगळे, एड राजविलास भिमटे ,एडवोकेट प्रफुल्ल पुडके, एडवोकेट रीना गणवीर, ऍडव्होकेट मनोज शर्मा, एडवोकेट नीतू जोशी ,ऍड जिजाबाई वाहने ,ऍड भीमा गेडाम, ऍड पंकज यादव आदी वकील वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच जयंत पाटील कार्यकर्त्यांच्या भेटीला ;उत्तर महाराष्ट्र पिंजून काढणार...

Mon Mar 27 , 2023
राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीच्या दौर्‍याची सुरुवात… नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघातून दौर्‍याला सुरुवात… नंदुरबार :- विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी (रविवार दिनांक २६ मार्च ) “राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…” या दौऱ्याला सुरुवात केली. राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com