आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार वंदना रायबोले यांना जाहीर

नागपूर :-साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर द्वारा कामठी येथील लघुउद्योजिका वंदना दिपक रायबोले यांना दिला जाणारा अत्यंत मानाचा असलेला राज्यस्तरीय ‘आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार’ जाहिर करण्यात आला आहे.

साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या निवड समितीचे संयोजक अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे यांनी त्यांना पत्राद्वारे कळविले आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचा वितरण सोहळा दि.५ मे २०२४ रोजी, आईन्स्टाईन सभागृह, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

वंदना दिपक रायबोले यांनी पतीचे कोरोना काळात अकाली निधन झाल्यानंतर खचून न जाता स्वकर्तृत्वाने गृह उद्योगाच्या माध्यमातून आपले जिवन स्वावलंबी केले असून समाजात एक आदर्श उद्योजिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना नारीशक्ती पुरस्कार, हिरकणी पुरस्कार ई.पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. असे प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिम युथ फाऊंडेशनचे आज जैन भवन गांधीबाग येथे समाज भूषण व अन्य पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम

Sun Apr 28 , 2024
– समाज भूषण पुरस्कार ॲड. नंदा पराते यांना जाहीर व आज जाहीर सत्कार  नागपूर :- आदिम युथ फाऊंडेशनच्या माध्यमाने रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जैन भवन गांधीबाग येथे गणमान्य व्यक्तींना समाज भूषण व अन्य पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी संघर्ष समितीचे संयोजक विश्वनाथ आसई ,प्रमुख पाहुणे म्हणून माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते राहतील. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com