रामटेक :- अंतर्गत मुरमुरा भट्टी बायपास रोड रामटेक येथे दिनांक ०५/०५/२०२३ चे ०९.०० ते वा. दरम्यान पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर क. MH-49-1525 मध्ये अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करतांनी १०.०० मिळुन आले. पिवळया रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर के MH-49-1525 चा चालक आरोपी नामे- किष्णा बुष्टुजी मारबते रा. छोटी अजनी कामठी हा टिप्पर मध्ये ०५ ब्रास रेती किंमती अंदाजे २५००० /- रूपयाचा मुद्देमाल चोरी करतांना मिळुन आल्याने आरोपींच्या ताब्यातुन असा एकूण वाहनासह २०,२५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी रामटेक पोलीसांनी, पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी श्रीकांत लाजेवार हे करीत आहे.