उष्मघाताचा धोका घोंगावतोय काळजी घ्या – डॉ शबनम खाणुनी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी शहरात तापमानाचा पारा 44 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचला असून उन्हाच्या तडाख्याने नागरिकांचा जीव टांगणीला आला असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांवर व पशु पक्ष्यावर उष्मघाताचा धोका घोंगावतोय तेव्हा नागरिकांनो काळजी घ्या असे आवाहन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.

सध्याचे उन्हाळ्याचे तापमान लक्षात घेता दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे व उन्हात फिरणे टाळावे,त्याचबरोबर शरीरात उष्णता निर्माण झाल्याने उष्मघाताची शक्यता नाकारता येत नाही.दुपारच्या वेळी 2 तास कामातुन विश्रांती घ्यावी .उष्मघात टाळण्यासाठी उन्हात अति कष्टाचे काम करू नये,कॉफी, चहा, थंडपेय घेणे टाळावे तसेच मद्यपान ,तंबाकू,गुटखा सुद्धा खाण्याचे टाळावे,दुपारी 12 ते 3 वाजताच्या दरम्यान घराबाहेर जाण्याचे शक्यतो टाळावे.उच्च प्रथिन युक्त आहार व शिळे अन्न खाऊ नये,गळद, घट्ट ब जाड कपडे घालण्याचे टाळावे,दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री,टोपी किंवा दुपट्ट्याचे वापर करावे,हलके व पातळ सूती कपडे वापरावेत, प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शरीरातील पाणी कमी वाटल्यास ओआरएस, घरगुती लस्सी,ताक,निंबु शरबत,आंब्याचा पन्हा प्यावे,अशक्तपणा,डोकेदुखी,सतत येणारा घाम,चक्कर येणे इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्ह ओळखा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी देण्यात यावे,घर थंड ठेवण्यासाठी पडदे,शटर,व सनसेडचा वापर करावा व रात्रीस खिडक्या उघड्या ठेवा,गरोदर स्त्रिया, लहान बालके,आजारी व वृद्ध व्यक्ती यांची अधिक काळजी घ्या.उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करता कामा नये,उष्मघाताचे परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Fri May 31 , 2024
मुंबई :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.            यावेळी उपसचिव रोशनी कदम – पाटील, अश्विनी यमगर, चंद्रशेखर तरंगे, अवर सचिव अशोक नायकवडे, नारायण माने, भरत बिडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com