आरोपीसह ३ मोटार सायकली जप्त खापरखेडा पोलीसांची कार्यवाही

खापरखेडा :- नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी. वी. पथकाने आरोपी १) कैलास हरिचंद्र तांडेकर वय ३२ वर्ष, २) आकाश हरिचंद्र तांडेकर वय ३० वर्ष दोन्ही रा. विना संगम यांचेकडुन ७ मोटार सायकली जप्त करण्यात आलेली असुन यांचेसोबत चोरी चे गुन्हयात सहभाग असलेला फरार आरोपी विजय उर्फ विक्की सुरेश तुरतर रा. कोराडी याला मध्यवर्ती कारागृह नागपुर येथुन ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्याने आणखी तिन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यामध्ये पोलीस स्टेशन खापरखेडा येथील २ मोटार सायकल व पोलीस स्टेशन कोराडी नागपुर शहर येथील १ मोटार सायकल जप्त केलेल्या आहे. पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी.वी. पथकाने दोन महिन्यात एकुण १० चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागिय पोलीस अधिक्षक संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनाजी जळक, पोउपनि आरती नरोटे, डी. बी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, कैलास पवार, अनिल वाढीवे, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण हद्दीमधील सट्टापट्टी लिहणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

Fri Jul 19 , 2024
नागपूर :- पोस्टे कुही येथील स्टाफ पोस्टे कुही परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मांढळ बस स्टॉपच्या मागे झाडाखाली एक इसम सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेवुन त्यांना कागदी चिठ्ठयावर स‌ट्टाप‌ट्टी, वरळी मटका जुगाराचे आकडे लिहुन जुगाराचा खेळ खेळवत आहे. अशा माहिती वरून कुही येथील मांढळ बस स्टॉपच्या मागे झाडाखाली सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे- लक्ष्मण बिशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com