बेला :- जमीनदार काळापासून बेला येथे चालत आलेली परंपरा जनतेच्या संमतीने अजूनही कायम आहे. तत्कालीन जमीनदार शंकरराव देशमुख यांचे नातू व महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्योतीकुमार देशमुख पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र प्रज्योत देशमुख यांनी चालवला असून यंदा त्यांचे हस्ते बैलास मखराचा साज चढविण्यात आला व तोरण तोडून पोळा फोडण्यात आला. यावेळी माधुरी देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे नवनियुक्त अध्यक्ष दादा शेंडे, पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, सुभाष देशमुख, सुरज कांबळे, राजेश लोहकरे, शंकरराव आमदे, गजानन लांडे, दिलीप घीमे, कैलास साठवणे महेंद्र व सुभाष तेलरांधे, दिनेश गोळघाटे, राजू सूर्यवंशी व अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.