मुंबई :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी महाराज रराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने सकाळी 9.10 वाजता नांदेड येथील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण झाले.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, व्हॉईस ॲडमिरल अजय कोचर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ब्रिगेडिअर ग्यानेंद्र त्रिवेदी, ग्रुप कॅप्टन संदीप सिंह यांच्यासह राजशिष्टाचार व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.