– मॅरेथॉन मधील प्रमुख विजेत्यासाठी रु. 25 लाखाचे बक्षिस
नाव नोंदणीची अंतिम तारीख 5 सप्टेंबर,2024
मुंबई :- जम्मू आणि काश्मिर सरकारच्या वतीने 20 ऑक्टोबर, 2024 रोजी ‘काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम रेस’ (Kashmir Marathon-The Autumn Race’) च्या उपक्रमाचे आयोजन करीत आहे यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम यामध्ये एकूण 42 किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन असे दोन भाग करण्यात आले आहे. या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या असोसिएशनकडून (AIMS)मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय मानकानुसार मान्यताप्राप्त बनली आहे.
मॅरेथॉन विजेत्यांना यथोचित बक्षिस देऊन गौरवण्यात येणार आहे. मॅरेथॉन मधील प्रमुख विजेत्यासाठी रु. 25 लाखाचे बक्षिस असून इतर विविध श्रेणींमध्ये 56 आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. हाफ मॅरेथॉनसाठी रू.15 लाख बक्षिस असून ते पुरूष व महिलांच्या गटांसाठी स्वंतत्रपणे देण्यात येणार आहे. याशिवाय मॅरेथॉन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था जम्मू आणि काश्मिर सरकारकडून करण्यात येत आहे.
धावपटूंना सहभागी होण्यासाठी माहिती, नोंदणी शुल्क, धावण्याची मार्गदर्शक तत्त्वे, मार्गाचा नकाशा आणि इतर सर्व संबंधित बाबी www.kashmirmarathon.jk.gov.in या पोर्टल वर उपलब्ध असून धावपटुांना या स्पर्धांमध्ये नाव नोंदणीची अंतिम तारीख 5 सप्टेंबर,2024 आहे. राज्यातील धावपटूंनी ‘काश्मिर मॅरेथॉन-द ऑटम रेस’ (Kashmir Marathon-The Autumn Race’) मध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा , असे आवाहन क्रीडा विभागाचे उप सचिव सुनिल हंजे यांनी केले आहे.