नवी मुंबई :- राज्य शासनाने आज समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणा-या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या शिक्षकांना सन 2023-24 या वर्षासाठीचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यातील एकूण 110 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्राथमिक शिक्षक वर्गात 38+1, माध्यमिक-39, आदिवासी क्षेत्र-19, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार-8, विशेष शिक्षक कला/क्रिडा-2, दिव्यांग शिक्षक-1, स्काऊट/गाईड-2 असे एकूण 109+1 पुरस्काराची संख्या आहे.
कोकण विभागातील पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक पुढील्रप्रमाणे. :- लक्ष्मण महादेव घागस, सहा.शिक्षक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, तोंडली केंद्र शिरवली, मुरबाड, जि. ठाणे, सचिन परशुराम दरेकर, सहा.शिक्षक, रायगड जि.प.शाळा, गोळेगणी, ता.पोलादपूर जि.रायगड, शिल्पा बळवंत वनमाळी, सहा.शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, आगवन नवासाखरा केंद्र सावटे, ता.डहाणू ,जि.पालघर यांचा समावेश आहे.
पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे मनोज शालिग्राम महाजन,सहा.शिक्षक आयईएस नवी मुंबई हायस्कूल जि.ठाणे, रंजना दिलीप देशमुख , मुख्याध्यापक, अभिनव ज्ञानमंदिर प्र.शाला,कनिष्ठ महाविद्यालय,कर्जत, जि.रायगड, रामकृष्ण राजाराम पाटील, सहा.शिक्षक , पूज्य आचार्य भिसे माध्यमिक विद्यालय, कासा, जि.पालघर यांचा समावेश आहे.
आदिवासी शिक्षक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पुरस्कार प्राप्त सुधीर पुंडलिक भोईर,सहा.शिक्षक, जि.प.शाळा, रातांधळे ता.शहापूर, जि.ठाणे, सचिन परशुराम शिंदे, सहा.शिक्षक, श्रमजीवी जनता विद्यामंदिर पोशीर,ता.कर्जत जि.रायगड, रविंद्र मंगीलाल जाधव,सहा.शिक्षक, जि.प.दाभोण, पाटीलवाडा पो.रणकोळ, ता.डहाणू, जि.पालघर यांचा समावेश आहे.