कळमेश्वर :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर ब्राम्हणी शिवार येथे दिनांक १३/०९/२०२३ से १७.०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना ट्रॅक्टर क्र. एम.एच. २९ ए. के ०५३७ मध्ये अवैधरित्या रेती चोरी करतांनी मिळून आले. ट्रॅक्टर क्र. एम. एच. २९ ए.के .०५३७ मध्ये आरोपी नामे- १) कैलास संतलाल परतेकी, वय २४ वर्ष, रा. ब्राम्हणी बस स्टॉप कळमेश्वर हा विना रॉयल्टी बिना नंबर असलेल्या ट्रॉली मध्ये अवैध्यरीत्या विनापरवाना रेती वाहतुक करतांना मिळून आल्याने त्यास ट्रॅक्टर व रेती बाबत विचारले असता ट्रॅक्टर हा २) राजु रामाजी डाखोळे, वय २९ वर्ष रा. हुडको कॉलोनी, शिव मंदिर जवळ कळमेश्वर यांच्या सांगणे वरून विना रॉयल्टी रेती घेवुन जात असतांना मिळुन आल्याने आरोपीतांकडुन ट्रैक्टर ट्रॉली एम. एच. २९ ए.के. ०५३७ किंमती ५,०००००/- रूपये व १ ग्रास रेती किंमती ६०००/- असा एकुण ५,०६,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. सदर प्रकरणी कळमेश्वर पोलीसांनी, पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपीतांविरुद्ध कलम ३७९, १०९ भादवि.अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा पुढील तपास सफौ. सुनिल मिश्रा हे करीत आहे.