भारतीय संविधानामुळेच स्त्रियांना सुरक्षा कवच – शिवमती सुषमा भड

– जिजाऊ ब्रिगेड कन्हान चा वार्षिक महिला मेळावा थाटात संपन्न. 

कन्हान :- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड कन्हान च्या वार्षिक महिला मेळाव्यात सुषमा भड अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ प्रमुख मार्गदर्शन पर व्याख्यानात बोलत होत्या. सुषमा भड पुढे म्हणाल्या की, हिंदु कोड बिलमुळे भारतीय स्त्रियांना हक्क आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. संविधाना मुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे. शिवरायांच्या जडणघडणीत जिजाऊ त्याच प्रमाणे, महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीसाठी सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्यात रमाई अशा या अनेक महानाईकांनी आपले( जिवन अर्पण केले. याच कारणामुळे भारतीय संस्कृतीत महा पुरुष घडले. महिलांनी आपले हक्क आणि अधिकारा साठी सतत लढा देत रहावे. जिजाऊ ब्रिगेड नी अधिक कार्यक्षमतेने काम करावे असे प्रतिपादन सुषमा भड हयांनी यावेळी केले.

कन्हान नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी जिजाऊ ब्रिगेड च्या कार्याची स्तुती केली. प्रमुख अतिथी डॉ शितल गिर्हे आणि डॉ स्वाती वैद्य यांनी महिलाचे आरोग्य व देखभाल यावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांनी महिला सक्षम करण्यास आत्मनिर्भर होणे, बेटी बचाव विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गीतगायन स्पर्धा, उच्च प्राथ. शाळा निलज च्या मुलीनी पथनाट्यातुन बेटी बचाव चा संदेश दिला. गोधळ, नुत्य स्पर्धा, वेशभुषा स्पर्धेत प्रथ म क्रमांक जिजाऊ- मीनाक्षी भोयर, व्दितीय महाराणी येसुबाई- अनुपमा इंगोले, तृतीय संत जनाबाई – सुनंदा दिवटे हयांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी न प कन्हान नगरसेविका गुंफा तिडके, रेखा टोहणे, पुष्पां कावडकर, अनिता पाटील, सुषमा  चोप कर यांना राजमाता जिजाऊं ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी सातपुते तर आभार प्रदर्शन प्रीती कुकडे हयांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा माया इंगोले, सचिव छाया नाईक, रंजना इंगोले, अल्का कोल्हे, लता जळते, विद्या रहाटे, पुष्पा चिखले, सुषमा बांते, उज्वला लोखंडे, सुनिता ईखार, मनिषा पारधी, माया भोयर, कमल गोतमारे, श्रीखंडे , माटे, निशा अहिर, प्रतिभा इंगोले, कविता खैरकार, रजनी इंगोले, उषा नाटकर, संध्या बेलसरे, संगिता गि-हे, मनिषा धुडस, सुनिता खैरकर, अनिता पार्जुणे, मिनल मडगे, सरला चिंचुलकर, वैशाली साकोरे, राजेश्वरी , नागाबाई फुटाणे, नीतु ओडियार, वर्षा सातपुते आदी नी सहकार्य केले. कार्य क्रमास महिलांनी बहुसंख्येने उपस्थिती राहुन सहभागी झाल्या होत्या. शिवभोजनां ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com