गौण खनिज वाहतुकीचे बनावट वाहतूक पासप्रकरणी कंपनीविरूद्ध कारवाई – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई :- गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबबात ‘सिस्ट‍िम इंटेग्रेटर’ म्हणून मे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा. लि कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कंपनीकडून गौण खनिज वाहतुकीचे दुय्यम बनावट वाहतूक पासेस प्रकरणी तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे त्रयस्थ पद्धतीने तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीविरुद्ध शासन स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

यासंदर्भात सदस्य जयकुमार गोरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील वाळू व इतर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूक संबंधी प्रक्रियेचे संगणकीकृत सनियंत्रणाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रियेतून मे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने महाखनिज संगणक प्रणाली विकसित केली आहे.

या कंपनीला शासनाने दिलेले कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्याविरूद्ध कंपनी न्यायालयात गेली आहे. कंपनीने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. कंत्राट रद्द झाल्यामुळे गौण खनिजबाबतची माहिती शासनाला देणे कंपनीला बंधनकारक आहे. ही संपूर्ण माहिती घेण्यात येईल. आवश्यकता पडल्यास या प्रकरणात दोषी असलेल्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इतर मागास प्रवर्गाची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील - बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

Sat Jul 13 , 2024
मुंबई :- इतर मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती अथवा गट वगळून आरक्षणाचे लाभ मिळविण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. ही उत्पन्न मर्यादा केंद्र शासनाच्या कार्मिक, नागरिकांच्या तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागामार्फत निश्चित करण्यात येते. ही उत्पन्न मर्यादा (नॉन क्रिमिलेअर) वार्षिक 15 लाख रूपये करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात एक महिन्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com