निवडणूक निरीक्षक राहुल कुमार यांचेकडून आमगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक व्यवस्थेची पाहणी

गडचिरोली :- 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक राहुल कुमार यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचेसमवेत आज आमगाव विधानसभा मतदार संघात भेट देवून निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली.

राहुल कुमार यांनी आमगांव विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट दिली. त्यांनी इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचे सिलींग व अभिरूप मतदान (मॉक पोल) कामाची पहाणी केली. तसेच पहाणीचे वेळी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना निवडणुक कामाबाबत आवश्यक त्या महत्वाच्या सुचना दिल्या.

यावेळी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसिलदार डॉ. रविंद्र होळी आमगांव, तहसिलदार संतोष महाले देवरी, तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले सालेकसा तसेच श्रीमती माधुरी टेकाडे अप्पर तहसिलदार चिचगड व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपने गरिबांना प्रतिष्ठा दिली; काँग्रेसने काय दिले? - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रोखठोक सवाल

Sat Apr 13 , 2024
– पूर्व व उत्तर नागपुरात जाहीर सभा नागपूर :- काँग्रेसने कष्टकरी, गरीब, मुस्लीम कुटुंबांना काय दिले? चहाची टपरी, पानठेला, कबाडीचे दुकान दिले. त्यांना ट्रक ड्रायव्हर केले, अशी टीका केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. भाजपने आणि नितीन गडकरी नावाच्या भाजप कार्यकर्त्याने गरीब कुटुंबातील तरुणांना रोजगार दिला. त्यांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणले. प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क मिळवून दिला. माझे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com