नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ च्या पथकातील अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत मोठा ताजबाग, तौसीफ किराणा दुकानाचे मागे रेड कारवाई केली असता आरोपी अमान इक्बाल शेख वय २० वर्ष रा. रघुजी नगर, छोटा ताजबाग दरबारचे बाजुला याने एकूण ६ गोवंश जनावरे त्यांना चारा पाणी न देता मरणाइतपत यातना देताना समक्ष दिसून आले. जनावरे किमती अंदाजे ६५,०००/- रूचा मुद्देमाल आरोपी कडुन जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे सक्करदरा येथे कलम ५(अ), ५(ब), ९. ९(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ११(ई) (एफ) प्राणी कुरता अधिनियम कायदाप्रमाणे गुन्हा होत असल्याने आरोपीस व जनावरे यांना पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे सक्करदरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन मुक्कामा सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. गोकुळ सूर्यवंशी, मपोउपनि निरजना उमाळे, नापोअ दिपक बोले, युवानंद कद्दू, चेतन पाटील पोअ संदिप सावलकर, श्रीकांत मारवडे यांनी केली.