नागपूर ग्रामीण हद्दीमधील सट्टापट्टी लिहणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

नागपूर :- पोस्टे कुही येथील स्टाफ पोस्टे कुही परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मांढळ बस स्टॉपच्या मागे झाडाखाली एक इसम सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेवुन त्यांना कागदी चिठ्ठयावर स‌ट्टाप‌ट्टी, वरळी मटका जुगाराचे आकडे लिहुन जुगाराचा खेळ खेळवत आहे. अशा माहिती वरून कुही येथील मांढळ बस स्टॉपच्या मागे झाडाखाली सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे- लक्ष्मण बिशन दुधपचारे वय ४९ वर्ष रा. वार्ड क. ३, मांढळ ता. कुही हा स‌ट्टाप‌ट्टी, वरली मटका जुगाराचे आकडे लिहताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता एक बॉल पेन किमंती ०५/०० रूपये व नगदी ७४५/- रूपये असा एकुण ७५०/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे कुही कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोस्टे सावनेर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलौंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा पाटणसावंगी येथे आरोपी नामे सुनील माणिकराव मडावी वय ४५ वर्ष यह. वार्ड नं १ पाटणसावंगी ता. सावनेर जि नागपूर हा सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून सट्टापट्टीचे वेगवेगळे जुगाराचे आकडे व पैसे मेऊन ते जुगाराचे आकडे कागदावर लिहून देऊन वरली मटक्याचा हारजीतचा जुगार खेळवताना मिळून आल्याने त्याचेकडून १) नगदी ४८०/- रू. २) एक निळया शाईचा बॉलपेन की. ०५/- रू. ३) एक सट्टापट्टीचे वेगवेगळे आकडे लिहिलेला कागद ४) एक निळ्या रंगाचा कार्बन को. ०५/- रू. एकुन ४९०/- रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम १२ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीताविरुद्ध धडक मोहीम

Fri Jul 19 , 2024
नागपूर  :- पोस्टे कुही येथील स्टाफ पोस्टे कुही हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबिरद्वारे माहिती मिळाली की, उमरेडकडे जाणाऱ्या रोडचे दिशेने एक इसम मोटरसायकलने दारूची अवैधरीत्या वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरून हिरो कंपनीची सि.डी. डिलक्स मो.सा. क. एम. एच.-४०/ सी.वी. ५५७७ ने अवैधरीत्या वाहतुक करणान्या इसमास नाकाबंदी केली असता आरोपी नामे सुनिल जालंदर परतेकी वय ४४ वर्ष रा. उंदरी ता. उमरेड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com