अमरदिप बडगे, प्रतिनिधी
४ दिवसाची पोलीस कोठडी ; अटक करण्यात आरोपींची संख्या पोहोचली सात वर
गोंदियात – संत नरहरी पतसंस्थेत 58 लाखाची अफरातफर केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पुन्हा दोन संचालकांना अटक केली आहे. तर अगोदर पाच संचालकांना अटक करण्यात आली होती. आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या सातवर जावून पोहचली आहे. नितेश बिसेन वर्ष ४४ रा. गोंदिया व पंकज वंजारी वर्ष ४३ रा. गोंदिया असे अटक करण्यात आरोपींची नावे असून दोघांनाही चार दिवसाची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. आणखी या प्रकरणात काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
गोंदियात २००९ साली संत नरहरी पतसंस्था सुरू करण्यात आली होती. या संस्थेमध्ये नागरीकांनी आपली खाती उघडली व पैसे जमा केले. मात्र पतसंस्थेत अनेक अनियमिततेचे कारण व विड्रॉल देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने या पतसंस्था मध्ये अससेल्या एजंट व खातेदारांनी पतसंस्थेच्या संचालकांची तक्रार सहाय्यक निबंधकाकडे दिली. सहाय्यक निबंधका कडून फेर लेखापरीक्षण २०१५ ते १९ पर्यंतचे करण्यात आले व एकूण ५८ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप समोर येताच. विविध कलमांतर्गत रामनगर पोलीस स्टेशनला एकूण १४ लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी सुरुवातीला पाच लोकांना अटक केली व २० जुलै ला दोन संचालकांना अटक करण्यात आली असुन न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले आहे.