जनावरांना निर्दयतेने वाहून नेणा-या आरोपीविरुद्ध कारवाई

मौदा :-अंतर्गत मौजा माधणी टोल नाका भंडारा ते नागपुर रोड येथे दिनांक १३/०५/२३ चे ०११५ वा ते ०२.३० वा दरम्यान, यातील आरोपी याने एक पांढ-या रंगाच्या बोलेरो पिकअप के एमएच ३५ एजे ०९४३ कि अंदाजे ३,५०,०००/रु मध्ये गोवंश जातीचे जनावरे अत्यंत क्रूरपणे निर्दयतेने मानेला व पायाला दोरे बांधून त्यांना इजा होईल अशा प्रकारे कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता बोलेरो पिकअप मध्ये कोंबलेल्या अवस्थेत दिसुन आल्याने सदर वाहनामध्ये १३ गोवंश जातीचे जनावरे प्रत्येकी २०,०००/ प्रमाणे एकूण १,३०,०००/ रु चा माल व गोवंश व गाडी एकुण कि ४,८०,०००/ रूचा माल मिळुन आल्याने सपोनि भुते यांनी पंचासमक्ष कार्यवाही करून पुर्ण जनावरे त्यापैकी १ गोवंश मयत पावले होते. १२ जिवंत गोवंश हे सुकृत गौरक्षण संस्था पिपळगाव ता लाखनी जि भंडारा येथे दाखल करण्यात आले.

सदर प्रकरणी सरतर्फे फिर्यादी नामे पो ना रोशन पाटील पो स्टे मौदा यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपी नामे रोशन ओमकार तरारे वय ३४ वर्षे रा चंगेरा राजेगाव पो स्टे रावनवाडी जि. गोंदिया यांचेविरोधात कलम २१(१) (ड) प्राणी संरक्षण अधि, ५ए, ५वी महा पशु संरक्षण अधिनियम सहकलम ८३ १७७ मो वा का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना रोशन पाटील पो स्टे मौदा हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बोरी सिंगारदीप येथे पाणी साठवीणारी नव्हे हलनारी टाकी - सरपंच दिलीप इंगोले

Mon May 15 , 2023
– तीन वर्षापूर्वीपासून पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तु. कोदामेंढी :- मौदा तालुक्यातील सीमेलगत पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गट ग्रा. पं. बोरिसिंगदीप अंतर्गत येणाऱ्या बोरी गावातील नागरिकांना नळयोजनच्या माध्यमातून पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याची टाकी तीन वर्षापूर्वी बनविण्यात आली, परंतु या टाकीवर चढन्यासाठी बनविण्यात येणाऱ्या शिढ़या या चढ़ताना हालत असल्याचे अडीच वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर कळले. माझ्या पूर्वीच्या सरपंचाच्या कार्यकाळात बोरी गावात पाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com