अखेर सईद नगर येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील शहरीकृत असलेले रनाळा गावातील सईद नगर हे गेल्या कित्येक वर्षापासून विकास कामा पासून वंचित असल्याने या परिसराचा विकासात्मक चेहरामोहरा बद्लविण्याचा निश्चय मनात हेरून नवनिर्वाचित सरपंच पंकज साबळे यांनी पुढाकार घेत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन सईद नगर येथील मुख्य रस्त्याचे मुख्य समस्या दूर करण्याची विनंती केली त्या विनंतीनुसार आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरपंच पंकज साबळे यांच्या विनंतीला मान देऊन सईद नगर येथे विधीवत निधी मंजूर करून विकास कामाला गती देण्याचे प्रयत्न केले. या होणाऱ्या विकास कामामुळे सईद नगर येथे येण्याजाण्याचे रस्ते चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल अशी ग्वाही सरपंच पंकज साबळे यांनी दिली. याप्रसंगी प्रामुख्याने सरपंच पंकज साबळे, ग्रामपंचायत सदस्य मंगला ठाकरे, आमिर खान यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमात वाहिद खान , बशीर भाई, आफताब भाई गुलाब भाई , आबिद भाई, खालिद भाई , जावेद भाई अशरफ खान , दानिश भाई, शुभम ठाकरे, अंकित रावत, खैरूनिसा हमीदली,रुखसाना परवीन, मसूदा अंसारी सह समस्त सईद नगर वासी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Fri Jun 23 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार ता. 22) 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एस. एस. असोसिएटस, जाफर नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com