नागपूर :-दिनांक १७.०५.२०२३ चे १५.१५ वा. ने सुमारास गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अधिकारी व अमलदार यांनी मिळवलेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन पोलीस ठाणे बजाजनगर हहीत बजाजानगर चौक, हरिश किराणा दुकान येथे पंचासमक्ष रेड कारवाई केली असता आरोपी राजकुमार मुरलीधर ढोक वय २२ वर्ष रा. ६३, निलकमल सोसायटी बजाजनगर यांचे ताब्यात प्रतिबंधीत इलेक्ट्रॉनिक सिगारेट विवीध फ्लेव्हरच्या एकूण किमती ३०,०१०/- या मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे बजाजनगर येथे कलम ४, ५, ७, ८ ईलेटॉनीक सिगारेट प्रतिबंध कायदा २०१९ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कारवाईस्तव आरोपीला जप्त मुद्देमालासह बजाजनगर पोलीसांचे ताब्यात दिले आहे. वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सहायक पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि शुभांगी देशमुख, सपोनि गुप्ता, पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा. वासनिक, विनोद देशमुख, प्रदिप पवार, पोना, सुशील, हेमंत लोनारे, चंद्रशेखर भारती व सोळके यांनी केली.