घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :-पोलीस ठाणे जरीपटका येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, भिमसेना नगर झोपडप‌ट्टी कडे जाणारा रोड, नारा घाट जवळ एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसल्याने, त्यास हटकले असता तो पोलीसांना पाहुन पळण्याचे प्रयत्नात असतांना त्यास पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव आशिष उर्फ बोड्या यादवराव चौधरी, वय ४१ वर्षे, रा. गल्ली नं. १०, अनिल खरे यांच्या भराजवळ, मोहन नगर, जरीपटका, नागपुर असे सांगीतले. त्याची कायदेशिर अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेत पॅन्टचे आत एक लोखंडी चाकु किंमती १००/- रू चा मिळून आल्याने जप्त करण्यात आला.

आरोपी हा कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्‌द्देशाने शस्त्रासह समक्ष मिळून आल्याने तसेच, त्याने मा सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे जरीपटका येथे सपोनि प्रविण सोनवणे यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का.. सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हे दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करून खंडणी मागणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Mon Apr 8 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत राहणाऱ्या ४९ वर्षीय फिर्यादी महिला यांची इंस्टाग्राम आयडीवरून आरोपी साहील मल्होत्रा, वय ३० वर्षे, रा. लुधीयाना याचेसोबत ओळख झाली व त्यांची मोबाईलवर बोलचाल होती. नोव्हेबर २०२२ मध्ये आरोपी हा नागपूरला फिर्यादीचे घरी येवुन, घरी कोणीही नसल्याचा फायदा घेवुन फिर्यादीस कोल्ड्रीक्समध्ये कोणतेतरी गुंगीकारक पदार्थ टाकुन फिर्यादीसोबत जबरीने शारिरीक संबंध केले व त्याचे फोटो काढले तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!