उमरेड :-दिनांक १५/०४/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन उमरेड येथील जुना बस स्टैंड परिसरात काही इसम है IPL मधील रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर विरूद्ध दिल्ली कॅपीटल यांचेमध्ये खेळल्या जाणान्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावण्यावर या प्रकारचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून सुंदर पथकाने जुना बस स्टैंड परिसरात सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे- १) दुकानाचा मालक राजेश सुरेश भुयारकर, वय ४५ वर्ष रा. आजाद चौक बुधवार पेठ उमरेड आणि २) अक्षय मंगेश महल्ले, वय २५ वर्ष व मंगळवारी पेठ वार्ड क २ उमरेड ३) राहुल खुशालराव इंरदांडे वय २९ वर्ष, उमरेड ४) आशिष मनोहर अग्रिहोत्री वय ३६ वर्ष रा. रसोडी वार्ड नं. २४ उमरेड ५) संजय चंद्रभान लेंडे वय ५२ वर्ष रा. इतवारी पेठ वार्ड क्र. ६ उमरेड ६) अनिल आनंदराव झोडे वय ५३ वर्ष रा. मंगळवारी पेठ वार्ड क्र.७ उमरेड हे मोबाईल फोन व एल ई डी टिव्हीच्या या इलेक्ट्रॉनिक साधनाव्दारे सुरू असलेल्या रॉयल चैलेन्जर्स बंगलोर विरूद्ध दिल्ली कॅपीटल या संघा दरम्यानचा लाईव्ह क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळताना मिळुन आले त्याचे ताब्यातून ४०७५० /- रूपये रोख रक्कम ६९००० /- रूपये किमतीचे एकुण ०५ मोबाईल फोन आणि एक एल ई डी टिव्ही किमती अंदाजे १००००/-रु. टाटा स्काय सेट टॉप बॉक्स किमती अंदाजे ३०००/- रू असा एकूण १२२७५०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे उमरेड येथे कलम ४/५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे उमरेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोहवा व नं. ५० गणेश गिरडकर मो. क्र. ७४४७३५५७४९ हे करीत आहे..
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत आशिषसिंग ठाकुर, सहायक फौजदार मडेकर, पोलीस हवालदार अरविंद भगत, दिनेश अधापुरे, पोलीस नायक अजीज शेख, सतिश राठोड, बालक पोलीस हवालदार अमोल कुठे, पोलीस शिपाई आशुतोष यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.