नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रोप स्किपिंग स्पर्धेमध्ये निर्माण डेलिकर आणि अंशिका बोरकरने सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. शनिवारी (ता.२०) हसनबाग उर्दू स्कूल येथे स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेत १२ वर्षावरील वयोगटात निर्माण डेलिकर ने सुवर्ण पदक, रिया भंडारकरने रौप्य पदक आणि अजितेश झलके याने कांस्य पदक पटकावले. १२ वर्षाखालील वयोगटात अंशिका बोरकरने प्रथम, सैइश मुछाल ने दुसरे आणि प्रिंशिका घनमोडे ने तिसरा क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत एकूण २२० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
शनिवारी सकाळच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, स्पर्धेचे कन्वेनर सुनील मानेकर, समन्वयक माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार, आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागपूर रोप स्किपिंग असोसिएशनचे आशिष देशपांडे, भूषण मैदुले, उर्मिला विद्याभानू, प्रणिता लांजेवार, मोनाली देशपांडे, भूमिका मून, सुशांत मून, आशीष डे, स्मिता घोरपड़े, स्वप्निल शेंडे, सवित वाल्दे, जावेद खान आदींनी सहकार्य केले.