श्रुती फिल्म प्रस्तुत “तूच माझी साक्षी” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

नागपूर :- शेतकऱ्यांच्या समस्या व साक्षीच्या प्रेमाची कबुली देणारा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट येतो आहे प्रेक्षकांच्या भेटीला. या चित्रपटाला तसं सांगायचं म्हटलं तर पडद्यावर येण्याकरिता 2017 पासून लेखक/ निर्माता/ दिग्दर्शक विलास गाडगे यांना संघर्ष करावा लागत आहे. व्यवहाराची देवाण घेवाण त्यातूनच आर्थिक टंचाईचा सामना करता करता आज या चित्रपटाला शूटिंग पूर्ण होऊन 7 वर्ष झाली आहे. थेंब-थेंब तळे साचून व आर्थिक बाजू नसतांनाही परत एकदा प्रयत्नाची पराकाष्ठा पणाला लाऊन व कर्ज बाजारी होऊन चित्रपट रिलीज करिता यांनी सज्ज केला आहे. खूप मोठ्या संघर्षातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामधील काही कलाकारांचा संपर्क तुटला असून काही अभिनेत्रीचे लग्न सुद्धा झाले आहे. ज्या प्रमाणे या चित्रपटामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून (रामू ) आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. परंतु रामुची पत्नी राधा च्या हिमतीने परत तो लोकांशी लढून व समाज कन्टकांशी लढून आपल्या परिस्थितीवर मात करतो आणि रामुची बहीण साक्षी ही गर्भ श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडते असा हा साक्षीला साक्ष देणारा मराठी चित्रपट 31 मे 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तरी आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊन अवश्य बघावा. जसे या चित्रपटामध्ये दृश्य घडले आहे असेच काही दृश्य लेखक/निर्माता /दिग्दर्शक विलास गाडगे यांच्या जीवनामध्ये घडले आणि घडत आहे. असे विषय सरासरी प्रेक्षकांच्या हिताचे कुणीच मांडण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु यांनी जो प्रयत्न केला आहे तो खरच कौतुकास्पद आहे. तरी प्रेक्षक वर्गाला विलास गाडगे यांनी अपील केली आहे. प्रेक्षक मायबाप हो बंधू भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे. आपण हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊन अवश्य बघावा व या चित्रपटाला भरभरून यश द्यावे. अशी आग्रहाची विनंती केली आहे.

यातील सर्व कलाकार विदर्भातील व मराठवाड्यातील असून उत्कृष्टरित्या यांनी काम केले आहे संगीतकार अभि / राम व गायक / गायिका यशश्री भावे, श्रुती चौधरी, मुकुल पांडे, अभिजित कौसंबी गीतकार – रोशन गौतम (पंडित) आश्रुबा सोडणर, कैलास भारस्कर असून यातील मंत्रमुग्ध गाणी सद्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत. तसेच यातील कलाकार -संदीप बुरडकर, प्राची सरकार, राहुल बारापात्रे, आकांक्षा साखरकर, सुनील हिरेखन, अजय राज, राणी बलवीर, सुजित मोरे, उर्मिला विभुते, कंचन (खुशी) कांबळे, देवेंद्र ढिवरे, अविनाश जावळकर, मीनाक्षी खरात, रोशन जाधव, शुभम यंगल, नरेश घोडके, दुर्गेश्वरी कछवाह, ललिता घनसावंत, उत्तम घुगे, दीपक कांबळे, दीपक डफाडे, विकास देसाई, बाळू सरोदे, कैलास भारस्कर, संजय सावंत, अमित राठोड, देवकीनंदन, राजू केदार, अरविंद वाघधरे, खुशी विभूते, तेजस्विनी राठोड, संजय तेजनकर, आश्रुबा सोडणर, रवींद्र खरात, महेश ठाकरे, आकांक्षा देशमुख, अनिल गावंडे, अनंत हटवार, मोरेश्वर खोडे, मधुकर हटवार, संतोष साळुंखे, तेजस गाडगे कॅमेरामॅन-सुभाष जयस्वाल ऑफिस सुपर व्हिजन-शारदा गजभिये, प्रोडक्शन मॅनेजर -अशोक अंबागडे कोरीयो ग्राफर -मंगेश देवके, संकलन-भूपी /विर प्रसाद, असिस्टंट डायरेक्टर -प्रकाश सिंह, आशिष मेश्राम, पोस्ट प्रोडक्शन-शंकुंतलम स्टुडिओ मुंबई, कार्यकारी निर्माता-शीतल गाडगे, तेजस गाडगे विशेष सहकार्य-संगीता गाडगे व या मराठी चित्रपटात इतरांचाही सहभाग आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील प्रवासी निवारे कुणाचे सहारे ?

Wed May 8 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली या योजने अंतर्गत कामठी तालुक्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले सदर बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या या निवाऱ्याची देखभाल, दुरुस्ती परिवहन मंडळातर्फे करणे गरजेचे असताना याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे यामुळे सध्या गाव तिथे प्रवासी निवारा या योजनेचा फज्जा उडाला असून कामठी तालुक्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com