मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीची वेरायटी चौक महात्मा गांधी प्रतिमेसमोर धरणा प्रदर्शन

– मणिपूर सरकार बरखास्त करा – कविता सिंघल संयोजिका, आप नागपूर

नागपूर :- मणिपूरची अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह घटनेच्या विरोधात आम आदमी पार्टी, नागपूर च्या संयोजिका कविता सिंघल यांच्या नेतृत्वात वेरायटी चौक गांधी प्रतिमेसमोर निषेध प्रदर्शन करण्यात आले.

मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला, त्यांची रोडवर धुंड काढण्यात आली, हा केवळ एक गुन्हा नसून घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांची क्रूरता समोर आली आहे. काही बदमाशांनी भारताचा आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही भाजपा शाषित राज्य सरकार कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का मोहोल असे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.

मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात त्रिव निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम् आदमी पार्टीने केली आहे.

या विरोध प्रदर्शन मध्ये प्रामुख्याने डॉ. देवेंद्र वानखडे, अंबरीश सावरकर, डॉ जाफरी, महिला अध्यक्ष सुष्मा कांबळे, कृतल वेलेकर, अजय धर्मे, शिरीष तिड़के,मंगेश डांगरे,गौतम कावरे ,सचिन लोनकर, संजय पाटिल, राजकुमार पखिड्डे, अंकुर ढोने, हेमंत भुजाडे, मनोज डोंगर, ध्रुव अग्रवाल,आकाश वैद्य, अभिजीत झा, अलका पोपटकर, सिद्धांत सोनारे, मोहसिन भाई, लक्ष्मीकांत दांडेकर, संगीता बाथो, अमर बाथो, राजेश भैया, पीयूष आकरें, फईम अन्सारी, विजय धकाते, मंजुश्री फोफरे, संजय बारापत्रे, रोशन डोंगरे, अमेय नारनवरे, प्रदीप पौनीकर, रविंद्र गिदोळे, पंकज मेश्राम, अजय भिमटे, कल्पना भावसार, प्रशांत अहिरराव, प्रीती शंभरकर, ज्योती ढोबळे, स्मिता घोरपडे इत्यादी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रस्त्यावर पाणी जमा होणार नाही याची दक्षता घ्या - मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

Fri Jul 21 , 2023
नागपूर :- नागपूर शहरातील कुठल्याही रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. पावसामुळे शहरात विपरीत स्थिती निर्माण होउ नये यासाठी प्रत्येक विभागाने सजग राहण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी नेहमी पावसाचे पाणी जमा होते त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करून पाणी राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com