सायकल रॅलीला लहान-थोरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक सायकल दिन : पर्यावरण संवर्धनासह आरोग्याचा दिला संदेश

नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आयोजित सायकल रॅलीमध्ये लहान-थोरांच्या सहभागाने आजची (शनिवार, ३ जून) सकाळ उत्साहपूर्ण ठरली. या रॅलीमध्ये ६ वर्षाच्या चिमुकल्यांपासून ते ८५ वर्षांच्या ज्येष्ठांच्या सहभागाने रॅलीचा उत्साह द्विगुणीत झाला.

विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी मनपा मुख्यालयापुढील मार्गावर झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस उपायुक्त विजय सागर, मनपा उपायुक्त सुरेश बगळे, उपायुक्त रवींद्र भेलावे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट तथा नागपूरचे बायसिकल मेअर डॉ. अमित समर्थ, सहायक आयुक्त (माहिती व तंत्रज्ञान विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, सहायक आयुक्त  गणेश राठोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, स्मार्ट सिटीच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, माजी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी नगरसेवक विजय झलके यांनी स्वत: या रॅलीमध्ये सहभागी होउन इतर सहभागींना प्रोत्साहित केले.

१६ किमी अंतराच्या या सायकल रॅलीमध्ये ६ वर्षाच्या चिमुकल्यांपासून ते ८५ वर्षांच्या ज्येष्ठांनी सहभागी होउन नागपूरकरांना पर्यावरणासाठीच नव्हे तर स्वत:च्या आरोग्यासाठी सायकल चालविण्याचा संदेश दिला. सायकलवर पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, अन्न संवर्धन अशा विविध आशयांचे फलक घेउन सायकपटू रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथून रॅलीला सुरूवात झाली. पुढे लिबर्टी टॉकीज चौक, छावणी चौक, जुना काटोल नाका चौक, जापनीस उद्यान चौक, लेडिज क्लब चौक, लॉ कॉलेज चौक, शंकर नगर चौका, झाशी राणी चौक, लोहापूल नवीन अंडरपास, मोक्षधाम चौक, अशोक चौक, रेशीमबाग चौक, जगनाडे चौक, गंगाबाई घाट चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, सी.ए. रोड, मेयो हॉस्पीटल, संविधान चौक या मार्गाने परत मनपा मुख्यालयात आली. रॅलीच्या मार्गावर विविध ठिकाणी सहभागी सायकपटूंवर पुष्प वर्षाव करण्यात आला तसेच पाणी बॉटल्स देखील वितरीत करण्यात आल्या.

रवींद्र परांजपे यांनी संचालन केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, उज्ज्वला चरडे, जितेंद्र गायकवाड, जितेंद्र बर्वे, प्रतिक तुरुतकाने यांनी सहकार्य केले. रॅलीच्या प्रारंभी झिन कविता अँड ग्रुपतर्फे झुम्बा डान्स व्यायाम करण्यात आले.

विविध पुरस्कारांनी सायकलपटूंना प्रोत्साहन

सायकल रॅलीमध्ये सहभागी सायकलपटूंना विविध पुरस्कार प्रदान करून त्यांना मनपाद्वारे प्रोत्साहित करण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषा करिता रेणू सिद्धू आणि डॉ. राजेंद्र जैस्वाल, सर्वाधिक कमी वयाचे सायकलपटू म्हणून ६ वर्षीय समया महाजन व स्वरा गजभिये, दक्ष खांडेकर आणि तेज तर सर्वाधिक वयाचे सायकपटू म्हणून फुलमती लाडे, डॉ. भूपेंद्र आर्य व धनाजीराव शिंदे आणि सर्वाधिक वयाचे ‘सायकलिस्ट कपल’ म्हणून प्रदीप व शोभा देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट संदेश घेउन सायकल रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल अलका वंजारी, उत्कृष्ट सायकल सजावटीकरिता निता कुमारी यांनाही सन्मानित करण्यात आले. टायगर सिटी सायकलिंग ग्रुपर आणि द सायकलिस्ट या दोन ग्रुपना बेस्ट सायकलिंग ग्रुप म्हणून गौरविण्यात आले.

दिग्गज सायकलपटूंचा सन्मान

देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सायकलिंगद्वारे देशाचे आणि नागपूर शहराचे नावलौकीक करणा-या दिग्गज सायकलिस्टना यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस उपायुक्त विजय सागर, मनपा उपायुक्त सुरेश बगळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रेस अक्रॉस इंडिया पूर्ण करणारे आंतरराष्ट्रीय सायकललिस्ट डॉ. अमित समर्थ, अतुल कडू, शुभम दास, गौरव गजभिये, बर्लिन अँड लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी आशिष अग्रवाल, कॅमरेड्स कल्याणी सतिजा, रजत नागपाल, सुरेश झंवर, डॉ. संजय जैस्वाल, कृष्णनाथ पाटील, राजेंद्र जैस्वाल, दिलीप वरखडे, सुनीता धोटे, कविता मुंडले, डॉ. भूपेंद्र आर्य आदींना यावेळी सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

संकेत, शुभांगी लकी ड्रॉ चे विजेते

मनपाद्वारे १ व २ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या सायकल एक्स्पोमध्ये चीप सायकल स्टोअर्सच्या वतीने लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला होता. यामध्ये संकेत बावनकर व शुभांगी सुपारे विजेते ठरले. दोन्ही विजेत्यांना चीप सायकल स्टोअर्सतर्फे गँग व्हीएक्स ही सायकल प्रदान करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाडीत १० वी च्या निकालात विद्यार्थ्यांची सरशी!, ५ शाळा शंभर नंबरी

Sat Jun 3 , 2023
वाडी :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी तारीख ०२ ला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला.जवळपास ६९ दिवसांनी राज्य मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामुळे गेल्या काही दिवसापासून निकालाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थी पालकांची प्रतीक्षा अखेर संपली. # वाडीतील जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा निकाल १०० टक्के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com