संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील तीन वर्षांपासून सर्वत्र तथाकथित महामारीच्या नावाखाली धुमाकूळ घालण्यात आला होता. सरकारने यावर नियंत्रण साधण्याआठी लॉकडॉउन तर लावलेच मात्र प्रसार प्रचाराच्या माध्यमातून कोरोनाचा ज्या जोमाने प्रसार करण्यात आला होता त्यामुळे नागरिकांनी सुदधा मोठा धसका घेतला होता.दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या दैनंदिन आकडेवारीने सामान्य माणसाचं मानसिक आयुष्य हे धाकधुकीचं झालं होतं यात सरकारने कोरोणावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाचा सपाटा सुरू केला होता.सगळीकडे कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून प्रतिबंधक लस घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं .यानुसार कामठी तालुक्यातील बहुतांश नागरिकांनी लसीकरण केले .या लसीकरणाचे दुष्परिणाम होतील असे अनेकांनी भाकीत सुद्धा केलं होतं .या आजारातून मुक्ती मिळावी याकरिता तर काही लोकांनी सरकारद्वारे पदोपदी केल्या जाणाऱ्या विविध अडवणुकीला वैतागून लस घेतली तालुक्यातील 90 टक्के लोकांनी लसीकरण पूर्ण केले मात्र तेव्हापासून पूर्वी बहुतांश निरोगी आणि ठणठणीत आयुष्य जगत असलेल्या येथील काही नागरिकांना अचानक हृदयाचे गंभीर आजार व्हायला सुरुवात झाली आहे.
यातील अनेकांनी औषधोपचार घायला सुरुवात केली मात्र तपासणी अंती काही लोकांना हृदयाचे गंभीर आजार झाल्याचे लक्षात आले आहे यामध्ये अनेकांचे अँजिओप्लास्टी तर कोत्येकांचे बायपास सर्जरी झाले आहेत.कामठी येथील बहुतांश नागरिकांना हृदयाचे विकार होणे ही धक्कादायक बाब समोर येत आहे. कित्येक जण हृदयविकाराच्या आजाराने अचानक चालता फिरता मृत्युमुखी पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असले तरी कुटुंबाचा आधार हिरावला.
कोरोना लसीकरण झाल्यानंतर सर्वसामान्यपणे अनेकांना ताप येण्याची लक्षणे जाणवली होती मात्र त्यावर डॉक्टरांनी मानवी शरिराची ही सर्वसामान्य प्रतिक्रिया आहे असे सांगून लोकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.काही लोकांना गरगरणे, चक्कर येणे,जीव घाबरणे अश्या प्रकारच्या व्यथा कोरोना लसीकरणा नंतर उदभवल्या होत्या.कोरोनाची लस घेऊन आता जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटुन गेला.या लसीकरणा नंतर अनेक नागरिकांच्या शारीरिक प्रक्रियेमध्ये थोडाफार बदल जाणवायला सुरुवात झाली असून बऱ्याच लोकांना हृदयविकाराचे आजार झाले आहेत ही बाब चिंतनीय आहे.तेव्हा खरंच कोरोना लसीचा शरीरावर विपरीत परिणाम होतो का?व त्यावर काय उपचार करावे ?जेणेकरून नागरिकांना सुसह्य आयुष्य जगता येईल यावर एकत्र येऊन संशोधन करणे गरजेचे झाले आहे.
@ फाईल फोटो